शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

ऐन निवडणुकीत हातोडा

By admin | Updated: January 25, 2017 02:08 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराच्या शेजारील जय शंकर फर्निचरच्या

रहाटणी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराच्या शेजारील जय शंकर फर्निचरच्या अनधिकृत तीन मजली इमारतीवर सकाळी साडेदहाच्या सुमारास कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुमारे तीन तास सुरू होती. ऐन निवडणुकीच्या काळात अचानक प्राधिकरणाची कारवाई सुरू झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण होते.अगदी सकाळीच दुकान उघडण्याच्या सुमारास प्राधिकरणाचे अतिक्रमणविरोधी पथक इमारतीच्या दारात पोलीस बंदोबस्तात उभे होते. दुकानातील सामान काढण्यासही त्या दुकानदारास वेळ देण्यात आला नाही. मात्र या पाडापाडीत दुकानातील सामानाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली. अगदी सुरुवातीला दुकानाचा दर्शनी भाग पाडण्यात आला. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील पत्राशेड पाडण्यात आली व तिसऱ्या मजल्यावरील भिंती मजुरांच्या साह्याने पाडण्यात आल्या. ही कारवाई थांबविण्यासाठी दुकानदार अतोनात प्रयत्न करीत होते. मात्र, अधिकारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मात्र त्यांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना करताच दुकानदारांनी थेट प्राधिकरणाचे कार्यालय गाठले. काही काळापुरती कारवाई थांबविण्यात आली.