शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
5
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
6
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
7
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
8
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
9
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
11
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
13
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
14
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
15
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
16
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
17
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
18
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
19
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
20
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी

पिंपरी चिंचवड शहरात जाचक अटींचे पालन करून सलूनची दुकाने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 17:07 IST

लॉकडाऊनच्या परिस्थितीत दुकान भाडे, लाईट बिल व कुटुंबाचा खर्च भागवणे सलून व्यावसायिकांना कठीण होत होते.

ठळक मुद्देआठवड्यातील सर्व दिवस सकाळी ९ ते ५ यावेळेत सलूनची दुकाने उघडी राहणार सेवा देताना फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, वैैयक्तिक स्वच्छता व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक

अतुल क्षीरसागरपिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरात चौथ्या लॉकडाउनमध्ये महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शिथिलता देण्यात आल्यानंतर जीवनावश्यक साहित्यांच्या दुकानाशिवाय काही अटी शर्तीवर सलूनची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तब्बल दोन महिन्यांपासून सलूनची दारे बंद होती. मात्र, शुक्रवारी (दि २२ ) महापालिका प्रशासनाने याबाबत आदेश देताच शहरातील स्पा व सलूनची दुकाने मंगळवारपासून उघडण्यात आली.लॉकडाऊनच्या परिस्थितीत दुकान भाडे, लाईट बिल व कुटुंबाचा खर्च भागवणे सलून व्यावसायिकांना कठीण होत होते. यामुळे सलून व्यावसायिकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत असल्याने सलुनची दुकाने पुन्हा सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने व्यावसायिकाना दिलासा मिळाला आहे.आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ९ ते ५ यावेळेत सलूनची दुकाने उघडी राहणार आहेत. या निर्णयाने सलून व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र सेवा देताना फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, वैैयक्तिक स्वच्छता व सॅनिटायझरचा वापर असणे बंधनकारक आहे. फिजिकल डिस्टनसिंग राखण्यासाठी दुकानासमोर ठराविक अंतराने मार्किंग करण्याची जबाबदारी संबंधित दुकानदारांची आहे.गेल्या दोन महिन्यांपासून सलून व स्पा सेंटर्स बंद आहेत. दरम्यान काही दुकाने उघडण्यास सवलत मिळाली. मात्र या व्यवसायावर निर्बंधच होते. त्यामुळे या व्यावसायिकांना मोठे नुकसान सोसावे लागले. कारागीरसुद्धा संकटात सापडले. अनेकांनी मोठी गुंतवणूक करून दुकानांचे आधुनिकीकरण केले होते. त्यांनासुद्धा मोठा आर्थिक फटका बसला.महापालिका प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार सलून सुरू करण्याची परवानगी दिल्याने या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

.........................................

फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन सलून चालविताना काही अटींचे पालन करावयाचे आहे. केश कर्तनालयात केस व दाढी करणा?्या व्यक्ती सोडून फक्त आणखी एकाच ग्राहकाला आत बसण्याची परवानगी आहे. तसेच ग्राहकांसाठी वापरण्यात येणारे साहित्य निजंर्तुकीकरण केल्यानंतरच उपयोगात आणावे. दाढी केल्यानंतर पुसण्यासाठी वापरण्यात येणारा टॉवेल प्रत्येक ग्राहकांसाठी वेगळा वापरावा आदी अटींचा समावेश आहे. फिजिकल डिस्टनसिंगचे पालन केले जात आहे.दरम्यान दुकाने उघडल्यानंतर आज पहिल्याच दिवशी सलून दुकांनामध्ये वर्दळ दिसून आली.

...................................

सलून व्यावसायिक ठेवत आहेत नोंदवहीसलून व्यावसायिक सुरक्षतेच्या दृष्टीने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करताना येणा?्या ग्राहकांच्या नोंदी ठेवण्याकरिता नोंदवही ठेवत आहेत. वहिमध्ये दिनांक, ग्राहकांचे नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक ही माहिती ठेवत आहेत.तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीची प्रत दर्शनी भागावर लावलेले पहावयास मिळाले. तसेच हात स्वच्छ ठेवण्यासाठीसॅनिटायझर,साबणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

..................................

सलून व्यावसायिकांच्या खर्चात झाली वाढप्रशासनाने सलून व्यवसाय सुरू करण्यास काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. यामध्ये उल्लेख केलेल्या अटींपैकी प्रत्येक ग्राहकाला नवीन टॉवेल वापरणे,प्रत्येकी चार तासाला संपूर्ण दुकान सॅनिटायझर करणे,डिस्पोजल ग्लोजचा वापर करणे,आता सेवा देतांना स्वत:च्या आणि ग्राहकाच्या आरोग्याची पुरेशी काळजी घ्यावी लागणार आहे.त्यासाठी अनेक साहित्य वापरावे लागणार असून सॅनिटायझर, मास्क, प्रत्येकाला स्वतंत्र टॉवेल, किंवा नॅपकिन वापरावी लागेल.यासाठी खर्चात वाढ होणार आहे.

टॅग्स :ravetरावेतHair Care Tipsकेसांची काळजीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर