शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१२७ शिक्षकांच्या भरतीला हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 01:26 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. प्राथमिक विभागामध्ये १२७ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार शाळांमधील बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्याआधारे रिक्त जागांची माहिती सरकारकडे पाठविण्यात आली आहे.११ मार्चपासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ज्या उमेदवारांनी ‘अभियोग्यता’ आणि ‘बुद्धिमत्ता चाचणी’ परीक्षा दिली आहे. असेच उमेदवार भरतीसाठी पात्र असणार आहेत. तसेच पवित्र प्रणालीमध्ये ‘उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना’ या शीर्षकाखाली उमेदवारांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांच्या आरक्षणानुसार रिक्त पदे दिसणार आहेत. शिक्षक भरतीमध्ये अनेकवेळा गैरव्यवहार झाले असल्याचे आरोप करण्यात आले. तसेच खासगी अनुदानितशाळांतील शिक्षक भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी व गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रिया होण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला उपाययोजना करण्यास सांगितल्या होत्या. त्यानुसार, यंदा संपूर्ण माहिती बिंदूनामावलीनुसार प्रसिद्ध करण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यार्थी संख्येच्या आधारे सर्व शाळांची संच मान्यता करण्यात आली. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. याप्रमाणे रिक्त पदे, विषय, प्रवर्ग यांची माहिती बिंदूनामावलीनुसार पवित्र संगणकीय प्रणालीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.>बिंदूनामावलीमध्ये बदलभरती करताना यापूर्वी बिंदूनामावली तपासली जात असे. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय यांसह विविध प्रवर्गांसाठी त्या-त्या प्रमाणात जागा राखीव ठेवून भरती केली जात असे. यापुढे होणाऱ्या भरतीमध्ये मराठा समाजासाठीही १६ टक्के जागा राखीव ठेवाण्यात आल्या आहेत. बिंदूनामावली तपासताना या १६ टक्क्यांचाही विचार होणार आहे. म्हणजे, यापूर्वी राखीव जागा सोडून सर्वसाधारण संवर्गांतील उमेदवारांसाठी ४८ टक्के जागा होत्या. आता मराठा समाजाच्या १६ टक्के जागा यातून कमी झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसाधारण संवर्गासाठी ३२ टक्के जागा शिल्लक आहेत.