शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सहकार विकास मंडळाची 'भारी' कामगिरी; २०० उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 14:42 IST

शेतकऱ्यांना दहा टन खतांचा रास्त दराने पुरवठा...

पिंपरी : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने दोनशे शेतकरी उत्पादक कंपन्यांना कॉप शॉपच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली. तसेच शेतकऱ्यांना दहा हजार टन खतांचा रास्त दराने पुरवठा केला आहे.सहकार विकास महामंडळाची विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यात महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पणन संचालक सतीशकुमार सोनी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, तज्ज्ञ संचालक गोकुळ राठी या वेळी उपस्थित होते. महामंडळाने २०१९-२० या वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा या वेळी घेण्यात आला. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेला कृषी माल राज्यातील दोनशे शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळाली बाजारपेठआणि कृषी प्रक्रिया उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम महामंडळांच्यामार्फत करण्यात आले. त्याचबरोबर पावणेदोनशे कृषी कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रास्त दरात दहा हजार टन खतांचा पुरवठा करण्यात आला. महामंडळाने गेल्या वर्षभरात दीड लाख रुपयांचा नफा कमावला. तसेच, राज्यात कृषी उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सूक्ष्म व लघु उद्योगांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन सेवा पुरविण्यात येणार असून, पर्यटन समन्वयक म्हणून ही काम करण्याचे नियोजन सुरू असल्याचे सहकार विकास महामंडळाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारMarketबाजार