शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेपेक्षा ग्रामपंचायतच सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 02:49 IST

आयटी पार्क हिंजवडीचा भाग असलेल्या मारुंजी ग्रामस्थांनी तब्बल ३ वेळा ग्रामसभेत ठराव करून महापालिका समावेशाला केराची टोपली दाखवून सपशेल विरोध दर्शविला आहे.

वाकड : आयटी पार्क हिंजवडीचा भाग असलेल्या मारुंजी ग्रामस्थांनी तब्बल ३ वेळा ग्रामसभेत ठराव करून महापालिका समावेशाला केराची टोपली दाखवून सपशेल विरोध दर्शविला आहे. गुरुवारी (दि. २२) ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात पुन्हा याबाबत रणनीती ठरविण्यासाठी ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. एकंदरीत ‘गड्या आपला गाव बरा’, असे मत ग्रामस्थांचे आहे.प्रचंड मोठा डोंगर किनारा आणि निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या मारुंजी गावचे भौगौलिक क्षेत्रफळ ६५४ हेक्टर ९६. ३ आर एवढे असून मागील जनगननेनुसार ४८५३ एवढी लोकसंख्या होती मात्र तो आकडा आता दहा हजारांच्या पुढे गेला आहे. अशातही गावाने साडेचार एकरांचे गायरान शाबूत ठेवण्यात यश मिळविले आहे. महापालिका किंवा पीएमआरडीए या दोनही संस्थांपेक्षा आमची ग्रामपंचायत सक्षम असून यापूर्वी समाविष्ट केलेल्या गावांचा विकास साधण्यास महापालिका अपयशी ठरली असल्याचे कारण पुढे करीत महापालिका कशासाठी असे म्हणत ग्रामस्थ महापालिका समावेशाला कडाडून विरोध करीत आहेत. गाव पीएमआरडीएच्या कक्षेत येण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने महापालिका लगतच्या दहा किमी अंतरावरील गावांना टाऊन प्लॅनिंगच्या कक्षेत घेत बांधकामाबाबत जाचक अटी लादल्या बिल्डिंग बायलॉज ए (अ वर्ग महानगर पालिका अधिनियम) लागू केला यानंतर म्हणजेच २०१५ ला पीएमआरडीए लागू केल्यानंतर आजपर्यंतच्या कालखंडात म्हणजेच सुमारे तीन वर्षात पीएमआरडीएने आत्मीयतेने गावच्या विकासासाठी काहीच योजना आखली नाही. त्यामुळे पीएमआरडीए किंवा महापालिका दोनीही काही कामाच्या नाही, असा समज लोकांचा आहे. अशातही बहुतेकांचा विरोध तर काहींची सकारात्मक प्रतिक्रिया देखील ऐकायला मिळाली.हिंजवडीला लागूनच असलेल्या या गावात दोन तीन आयटी कंपन्या आहेत. ग्रामपंचायतीने रस्ते, शुद्ध फिल्टर पाणी, कचरा व्यवस्थापन, काँक्रीटचे पक्के रस्ते, आधुनिक ग्रामपंचायत कार्यालय, भूमगत गटारे, अशा भक्कम नागरी सुविधा पुरविल्या आहेत गावात माध्यमिक विद्यालय, क्रीडांगण आहे असे असताना तीन वर्षात पीएमआरडीएने गावच्या नियोजनबद्ध विकासासाठी कुठेही ठोस पाऊल उचलले नाही. याच्या उलट बांधकामाबाबत किचकट आणि जाचक अटी लागू केल्या त्यामुळे कायदेशीर मागार्ने बांधकाम करणाºयास अडथळे आणि अनधिकृत विनापरवाना बांधकाम करावे तर ते पाडण्याची भीती अशा द्विधा मन: स्थितीत ग्रामस्थ आहेत.आमचे गाव स्वयंपूर्ण आहे. महापालिका ज्या सुविधा पुरविणार आहे त्या सुविधा आम्ही पुरवितोच. उलट महापालिका प्रशासनच्या पुढे जाऊनही अनेक नागरी सुविधा आम्ही पुरविल्या आहेत. पूर्वी समाविष्ट केलेल्या गावांचे भिजत घोंगडे कायम आहे. या गावांची काय अवस्था आहे हे देखील महापालिकेने तपासणे गरजेचे आहे. केवळ गावांना समाविष्ट करून कराच्या बोजा नागरिकांवर लाडात महापालिका तिजोरी भरणार असेल, तर हा निर्णय चुकीचा आहे. विकास आरखडा आणि त्याची अंमलबजावणी करावी.- बायडाबाई बुचडे, सरपंच, मारुंजीमहापालिकेने गेल्या १०-१५ महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावांची अवस्था काय आहे हे सर्वश्रुत आहे. महापालिकेत गाव जाऊन बकालपणा वाढणार असेल, तर हा समावेशाचा घाट कशासाठी, असा माझा प्रश्न आहे. पूर्वी समाविष्ठ झालेल्या गावांचा विकास आराखडा अद्याप विकसित नाही. आहे तेच महापालिकेला आवाक्याच्या बाहेर जात आहेत. त्यात आणखी भर कशासाठी आमची गावे समाविष्ट करावीत; मात्र दोन वर्षात विकास आराखडा मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन महापालिकेने द्यावे, अन्यथा आमचा विरोध कायम आहे.- शिवाजी बुचडे पाटील, ग्रामस्थ