शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ध्यान योगी आचार्य श्री डॉ.शिवामुनी म.सा.यांचे चिंचवडमध्ये जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 15:15 IST

आचार्यश्रींच्या स्वागताची जय्यत तयारी चिंचवडमध्ये करण्यात आली होती.

ठळक मुद्दे हजारो जैनबांधव आणि विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून घेतले गुरू भगवंतांचे दर्शन

चिंचवड: हर्ष - हर्ष जय जय चा जयघोष करित ध्यानमुनी प.पु.आचार्य डॉ.श्री शिवमुनीजी म.सा.व युवाचार्य श्री महेंद्र ऋषीजी म.सा.आदी ठाणा यांचे चिंचवड मध्ये जंगी स्वागत करण्यात आले.आज सकाळी सात वाजता आकुर्डी जैन स्थानकातून या जैन मुनींचे चिंचवड येथे आगमन झाले.यावेळी हजारो जैन बांधव व जैन विद्याप्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून गुरू भगवंतांचे दर्शन घेतले.आचार्यश्रींच्या स्वागताची जय्यत तयारी चिंचवडमध्ये करण्यात आली होती.शहरातील रस्त्यांवर जैन बांधव मोठ्या संख्येत स्वागत करण्यासाठी सज्ज होते.

आकुर्डीतील नवीन बांधण्यात आलेल्या जैन स्थानकातून आज या मुनींचे प्रस्थान झाले.याप्रसंगी संतोष कर्णावट,मनोज सोळंखी,प्रकाश मुनोत,राहुल पारख,नितीन बेदमुथा यांच्या सह निगडी,आकुर्डी,प्राधिकरण परिसरातील जैन बंधाव उवस्थित होते.उद्योगनगरातील नव्याने होत असलेल्या तेरा पंथी भवनास भेट दिल्यानंतर आचार्य श्री प्रेमलोकपार्क मार्गे चिंचवड गावातील जैन विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणता दाखल झाले. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले.या विद्यालयातील प्रत्येक विभागास भेट देऊन त्यांनी शिक्षक,कर्मचारी व  विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धाडीवाल,राजेश सांकला,सेक्रेटरी राजेंद्र मुथा,अनिल कांकरिया यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.मंडळाच्या प्रांगणात जैन ध्वजाचे अनावरण आचार्यश्रींच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी स्काऊट,गाईड च्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.चिंचवड मधील चापेकर चौक मार्गे शोभायात्रेच्या माध्यमातून गांधीपेठ जैन स्थानकात स्वागत करण्यात आले.जैन साधू संतांच्या जय घोषाने परिसर दुमाणून गेला होता.
भोई आळी मार्गे या शोभायात्रेची सांगता कल्याण प्रतिष्ठान येथे झाली.या प्रसंगी संघाचे अध्यक्ष दिलीप नहार,सुरेश सेठिया,उमेश भंडारी,अशोक बागमार,प्रा.अशोक पगारिया,हेमंत गुगळे, संतोष धोका,राजेंद्र जैन,नंदकुमार लुणावत,मनोज बाफना,उपमहापौर सचिन चिंचवडे,नगरसेवक सुरेश भोईर,राजेंद्र गावडे,पिंपरी-चिंचवड सकल जैन संघाचे पदाधिकारी विर विशाल संघाचे अध्यक्ष मयुर शिंगवी,कार्यकर्ते,महिला मंडळाच्या महिला पदाधिकारी,महिला कार्यकर्त्या व जैन बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडJain Templeजैन मंदीर