शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचाऱ्यांना खूषखबर ; सातवा वेतन आयोग मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 19:43 IST

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळाली असून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून ९००२ कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

पिंपरी : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळाली असून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून ९००२ कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. आयोगामुळे कर्मचाऱ्याचे वेतन हे सुमारे १७ ते २२ टक्के वाढणार आहे. वेतनावर महापालिकेचा सध्या ३६ कोटी रूपये महिन्याला खर्च होतो. त्यात आठ कोटींची वाढ होऊन ४४ कोटी रूपये एवढा खर्च वेतनावर होणार आहे. कर्मचारी महासंघाने वेतन आयोग अंमलबजावणीचे स्वागत केले आहे.

पिंपरी-चिंचवड महानपालिकेत विविध विभागांचे वर्ग एक ते चारचे कर्मचारी ७९५५ कर्मचारी असून शिक्षण मंडळासह सुमारे नऊ हजार दोन कर्मचारी महापालिकेत आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, अशी मागणी कर्मचारी महासंघाने राज्य शासनाकडे केली होती. तसेच महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार सरकारने महापालिका कर्मचाºयांना खुशखबर दिली आहे. राज्य शासनाने वेतनआयोग देण्यात यावा, अशा सूचना महापालिकेस दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेतील कर्मचाºयांना वेतनआयोगानुसार पुढील महिन्यांपासून वेतन मिळणार असून २०१६ पासूनच्या वेतन फरकाची रक्कमही देण्यात येणार आहे. अ वर्ग कर्मचाºयांचे वेतन हे २३ हजांरानी तर वर्ग दोनचे वेतन २१ हजार रूपयांनी, वर्ग तीनचे वेतन १७ हजार रूपयांनी वर्ग चारचे १० हजार रूपयांनी वाढणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकर्मचारी महासंघ अध्यक्ष,  शशिकांत झिंजुर्डे म्हणाले,‘‘कर्मचारी महासंघाने, लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री यांना मनपा कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागु करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. त्यानुसारकॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सातवा वेतन आयोग लागु करण्याचा निर्णय घेतला. पिंपरी चिंचवड सह राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत यांना सप्टेबरपासून वेतन आयोग लागु करण्याचा निर्णय घेतला आहे. ’’

टॅग्स :Governmentसरकारmunicipal schoolमहापालिका शाळा