नीलेश जंगम, पिंपरी दसऱ्याचा शुभ मुहूर्त साधत पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. या मुहूर्तावर २० ते २३ आॅक्टोबर या चार दिवसांत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) ६ हजार ३५३ वाहनांची नोंद झाली असून, यातून ३ कोटी ९१ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. आरटीओत २० ते २३ आॅक्टोबर या कालावधीत १९५९ चारचाकी, तर ४३९४ दुचाकींची नोंद आहे. त्यामुळे चारचाकीतून १ कोटी ९२ लाख, तर दुचाकीतून १ कोटी ९९ लाख रुपये उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी १ ते ४ आॅक्टोबर या कालावधीत १३८२ चारचाकी, ३२५१ दुचाकीची नोंद झाली होती. चारचाकीतून १ कोटी २ लाख व दुचाकीतून १ कोटी ३० लाख रुपये महसूल जमा झाला होता.
मंदीतही लुटले तीन कोटींचे सोने
By admin | Updated: October 26, 2015 01:44 IST