शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

देवा... सात जन्मी हीच बायको मिळू दे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 21:58 IST

वटपौर्णिमेच्या सणाला महिला मंडळी आपल्याला हाच पती सात जन्म मिळण्यासाठी वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात. पण....

ठळक मुद्देवटपोर्णिमेचा सण : उद्योगनगरीत पुरुष मंडळाचा उपक्रम

हणमंत पाटील 

पिंपरी : आधुनिक काळात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला विविध क्षेत्रांत काम करीत आहेत. तरीही परंपरेनुसार वटपौर्णिमेच्या सणाला महिला मंडळी आपल्याला हाच पती सात जन्म मिळण्यासाठी वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात, तर पुरुषांनीसुद्धा हीच पत्नी सात जन्म मिळावी यासाठी पूजा करण्यास हरकत नाही, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरातील मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेतर्फे पिंपळे गुरव येथे पुरुष मंडळींकडून उद्या (बुधवारी) सकाळी वटवृक्षाची पूजा करण्यात येणार आहे. भारतीय संस्कृतीत हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानुसार वटपौर्णिमेच्या सणादिवशी महिला सकाळपासून वटवृक्षाच्या पूजेची तयारी करतात. दीर्घायुष्य देणाऱ्या वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालून सूत गुंडाळतात. या वेळी सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. घरी पुरणपोळी व गोड पदार्थ केले जातात. पत्नी-पतीचा आदर व पूजा करते. आता काळ बदलला आहे. पुरुषांप्रमाणे महिलाही विविध क्षेत्रांत आघाडीवर आहेत. त्यामुळे समाजात स्त्री-पुरुष समानता निर्माण व्हावी, यासाठी पिंपरी-चिंचवड येथील मानवी हक्क संघटनेने पुढाकार घेत ह्यही पत्नी सात जन्म मिळू दे, अशी प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी दिली. सामाजिक बांधिलकीतून संघटनेच्या वतीने पिंपळे गुरव येथील जिजाऊ उद्यानाजवळील कांकरिया गोडाऊन येथे बुधवारी (दि. २७) सकाळी १० ला पुरुष मंडळींकडून वटपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्लॅस्टिक न वापरण्याची व पर्यावरण जनजागृतीची शपथ नागरिकांना देण्यात येणार आहे. या प्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, शहर उपाध्यक्ष विकास शहाणे, संगीता जोगदंड, अ‍ॅड. सचिन काळे, एस. डी. विभुते, दीपक शहाणे, गजानन धाराशिवकर, अरुण पवार, अरविंद मांगले, वसंत चकटे, मुरलीधर दळवी, हनुमंत पंडित, दत्तात्रय घोरपडे, अदिती निकम, शांताराम पाटील आदी पुरुष मंडळी व महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिला