शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘पिफ’च्या मुख्य व्यासपीठाला ‘पुलं’चे नाव देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 02:18 IST

ज्येष्ठ संगीतकार नौशाद, स्नेहल भाटकर आणि ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांच्या आठवणींनाही या ठिकाणी उजाळा देण्यात येणार आहे.

पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, सिद्धहस्त लेखणीतून रसिकांच्या मनात ‘गीतरामायण’ची ज्योत चेतवणारे ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर आणि त्याला स्वरसाज चढवीत सांगीतिक विश्वात हे महाकाव्य अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे आंतरराट्रीय चित्रपट महोत्सवच्या (पिफ) फोरमला ‘पु. ल देशपांडे’ यांचे तर फोरमच्या बाहेरील प्रवेशद्वारास गदिमा आणि सुधीर फडके यांची नावे देण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ संगीतकार नौशाद, स्नेहल भाटकर आणि ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांच्या आठवणींनाही या ठिकाणी उजाळा देण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, फाउंडेशनच्या विश्वस्त सबिना संघवी, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अभिजित रणदिवे आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य शासन यांच्या वतीने येत्या १0 ते १७ जानेवारीदरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रंगणार आहे. चिली देशातील गोंजालो जस्टिनिअँनो यांनी दिग्दर्शित केलेला ‘डॅम किड्स’ हा स्पॅनिश चित्रपट या वर्षीच्या पिफची ‘ओपनिंग फिल्म’ असणार आहे. याशिवाय मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात सात चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मुळशी पॅटर्न, नाळ, खटला बिताला, भोंगा, चुंबक, बोधी, दिठी यांचा समावेश आहे. या वर्षी ‘रेस्ट्रोपेक्टिव्ह’मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक मेहबूब खान यांचे ‘अमर’, ‘अंदाज’ आणि मदर इंडिया, तर इटालियन दिग्दर्शक बर्नार्डो बर्टोलुस्सी यांचे ‘द लास्ट एम्परर’, ‘लिटील बुद्धा’ आणि ‘लास्ट टँंगो इन पॅरिस’हे चित्रपट दाखविले जातील.

याशिवाय काही मान्यवर कलाकारांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ‘ट्रिब्युट’ विभागांतर्गत अभिनेत्री श्रीदेवी यांचा ‘इंग्लिश विंग्लिश’, दिग्दर्शिका कल्पना लाझमी यांचा ‘रुदाली’ आणि पटकथाकार शिनोबु हशीमोटो यांचा ‘टू लिव्ह’ हे चित्रपट दाखविण्यात येतील, तर ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांचा ‘भुवन शोम’द्वारे त्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे.’पिफ फोरम’मधील आयोजित कार्यक्रमच्विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानांतर्गत प्रसिद्ध पटकथा लेखक कमलेश पांडे यांचे व्याख्यानच्प्रसिद्ध कलाकार रोहिणी हट्टंगडी यांचे व्याख्यान, विषय ‘माझा प्रवास - अभिनेत्रीचे मनोगत’च्श्याम बेनेगल यांचे ‘द कंटिन्यूड रिलेव्हन्स आॅफ गांधी’ या विषयावर व्याख्यानच्‘अंधाधुन’ चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्याशी संवादच्‘सिंगिंग स्ट्रिंग्ज’ या कार्यक्रमांतर्गत मानस गोसावी यांचे मोहनवीणावादनच्‘२०१८ सालातील मराठी चित्रपटांचे यश’ या विषयावर परिसंवाद, सहभाग- प्रवीण तरडे, भाऊराव कºहाडे, दिग्पाल लांजेकर, संदीप जाधव, राजेंद्र शिंदे, सौमित्र पोटे, मेघराज राजेभोसले आणि विनोद सातवच्‘३६० सिनेमा अ‍ॅण्ड ट्रान्समीडिया’ या विषयावर व्याख्यान, सहभाग चित्रपटनिर्माते बायजू कुरूप, विवेक सुवर्णा आणि प्रसिद्ध छायाचित्रकार नीरज गेराच्इटलीच्या प्रसिद्ध वेशभूषाकार डॅनिएला सिअ‍ॅन्सिओ यांचे व्याख्यानच्‘डॉन स्टुडिओ’चे सादरीकरणच्‘तपस’ या बॅण्डचे सादरीकरण 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड