शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या कारणावरुन प्रियकराने केला प्रेयसीचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 22:23 IST

लग्नाच्या कारणावरुन झालेल्या वादातून प्रियकरानेच प्रेयसीचा खून केल्याची घटना पिंपरी येथे घडली. किरण अरुण काते (वय २३, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

पिंपरी : लग्नाच्या कारणावरुन झालेल्या वादातून प्रियकरानेच प्रेयसीचा खून केल्याची घटना पिंपरी येथे घडली. किरण अरुण काते (वय २३, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी अक्षय विनायक लाखे (वय २०, रा. भोरमळा, जुना ओरा रोड, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीचा मामा रविंद्र दामोदर ससाणे (वय ३८, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किरण काते आणि अक्षय विनायक लाखे यांच्यात प्रेमसंबंध होते. बुधवारी रात्री ते भेटले असता त्यांच्यात लग्नाच्या कारणावरुन भांडण झाले. त्यावेळी आरोपी अक्षयने किरण हिचा एचए कॉलनीतील बंगला नंबर एफ २ येथे गळा दाबून व डोक्यात वीट घालून खून केला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या तपासासाठी तीन पथके तयार करुन किरण राहत असलेल्या वस्तीतील लोकांकडे चौकशी करुन माहिती घेतली असता अक्षय हा किरणला बुधवारी भेटला असल्याचे समोर आले. तसेच तो बुधवारी रात्री महात्मा फुलेनगर झोपडपट्टी येथे बहिणीकडे आला होता, अशीही माहिती मिळाली.

त्यानंतर लगेचेच पोलिसांनी आरोपीच्या बहिणीकडे चौकशी केली असता अक्षय हा नाशिकला जाण्यासाठी नाशिकफाटा येथे गेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथक तातडीने नाशिक फाटा येथे गेले असता आरोपी अक्षय हा शिवशाही बसमध्ये बसला असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ निरिक्षक कल्याण पवार, निरिक्षक रंगनाथ उंडे, सहायक निरिक्षक अन्सार शेख, उपनिरिक्षक हरिदास बोचरे, उत्कर्षा देशमुख, कर्मचारी राजेंद्र भोसले, आजिनाथ सरक, रमेजा गोलंदाज, प्रतिभा मुळे, रोहित पिंजरकर, अविनाश देशमुख, सुहास डंगारे, नामदेव राऊत यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनrelationshipरिलेशनशिप