शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीतील समस्या लावणार मार्गी , शेतक-यांवर अन्याय होणार नाही - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 02:57 IST

आयटी पार्कच्या सर्व समस्या लवकरच मार्गी लावण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू असून, सर्वच शासकीय संघटना यात महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. विकासाच्या या मार्गात काही शेतक-यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार असल्याने शेतक-यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याकडेही सरकार जातीने लक्ष देणार आहे, असे मत पालक मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

 हिंजवडी : आयटी पार्कच्या सर्व समस्या लवकरच मार्गी लावण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू असून, सर्वच शासकीय संघटना यात महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. विकासाच्या या मार्गात काही शेतक-यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार असल्याने शेतक-यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याकडेही सरकार जातीने लक्ष देणार आहे, असे मत पालक मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.म्हाळुंगे, हिंजवडी, माण येथील बाधित शेतकºयांशी देखील बापट यांनी या वेळी चर्चा केली. पीएमआरडीएच्या माध्यमातून म्हाळुंगे येथे नव्याने टाऊनशिप उभारण्यात येत आहे. तसेच प्रस्तावित रस्त्यातही अनेक शेतकºयांच्या जमिनी विकासाच्या कामासाठी घेतल्या जाणार आहेत. जे शेतकरी जमिनी देणार आहेत, त्यांना वाढीव एफएसआय, टीडीआरच्या माध्यमातून मिळणारे लाभ देखील अधिक असणार आहेत. त्यामुळे शेतकºयांमधील असुरक्षिततेची भावना कमी होत आहे. उर्वरित शेतकºयांशीदेखील बोलणी सुरू असून, त्यावर योग्य तोडगा काढण्यात येत आहे. महापालिका हद्दीपासून हिंजवडीपर्यंत असलेला रस्ता रुंदीकरण, सिग्नल बसवणे आदी मागण्याही त्यांनी मान्य केल्या.पावसाळ्यानंतर रस्त्याच्या अडचणी कमी होतील, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. हिंजवडी ग्रामस्थांनी कचरा व्यवस्थापनासाठी २ एकर जागेची मागणी केली होती. हिंजवडी, मारुंजी, माण व एमआयडीसीतून निर्माण होणाºया कचºयाचे व्यवस्थापन यातून होणार होते. मात्र एमआयडीसी त्यावर काहीच प्रतिसाद देत नसल्याचे या वेळी ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिल्यावर यावर योग्य प्रकारे अंमलबजावणी करून निर्णय घ्यावा, असे बापट म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे