शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गॅस रिफिलिंग बनतेय स्फोटांची केंद्रे, उद्योगनगरीत गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 03:45 IST

नामांकित गॅस कंपन्यांचे सिलिंडर घ्यायचे...त्यातील गॅस काढून दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरायचा...कमी वजनाचे सिलिंडर ग्राहकांना विक्री करायची...काळ्या बाजाराच्या सिलिंडर विक्रीतून बक्कळ कमाई करायची...असा गोरखधंदा शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

पिंपरी - नामांकित गॅस कंपन्यांचे सिलिंडर घ्यायचे...त्यातील गॅस काढून दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरायचा...कमी वजनाचे सिलिंडर ग्राहकांना विक्री करायची...काळ्या बाजाराच्या सिलिंडर विक्रीतून बक्कळ कमाई करायची...असा गोरखधंदा शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काळ्या बाजाराने गॅसविक्री करणारे रॅकेट सक्रिय असून लोकवस्तीच्या भागात अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंगची बेकायदा सेंटर उघडलेली आहेत. ही सेंटर बॉम्ब स्फोटासारखी केंद्र बनल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.चिखली येथे गॅस रिफिलिंग करताना झालेल्या स्फोटात आजूबाजूच्या दुकानांचे मोठे नुकसान झाल्याची घटना गतवर्षी घडली. रस्त्याने जाणाºया भगवान हिंगे या महापालिका कर्मचाºयाचा या दुर्घटनेत जीव गेला. ही घटना घडल्यानंतर अशा प्रकारांवर नियंत्रण येईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र अशा प्रकारची बेकायदा आणि धोकादायक गॅस रिफिलिंग सेंटर शहराच्या विविध भागांत थाटली गेली आहेत. राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्ती या रॅकेटमध्ये असल्याने अधिकाºयांना ठोस कारवाई करण्यास अडचणी येत आहेत. वाल्हेकरवाडीतील गॅस रिफिलिंग सेंटरमध्ये सुमारे ३०० सिलिंडरचा साठा पुरवठा अधिकाºयांना आढळून आला.यापूर्वी बेकायदा गॅसचा साठा करून बाजारात चढ्या भावाने विक्री करणाºया एकाला चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. चिंचवडेनगर येथे ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीकडून तीन मोठे आणि १२ लहान सिलिंडर जप्त केले. प्रल्हाद बाबूराव पाटील (वय २१, रा. नºहेगाव) या आरोपीसह १५ सिलिंडर जप्त केले होते. त्या वेळी पुरवठा अधिकारी लक्ष्मण मारुती भांगे (वय ५५, रा. कामगारनगर, पिंपरी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार रहाटणी-काळेवाडी रस्त्यावर उघडकीस आला आहे. मुद्देमालासह एका जणाला पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. रहाटणी- काळेवाडी रस्त्यावरील सिद्धनाथ गॅस सर्व्हिस या ठिकाणी घरगुती वापराचे गॅस सिलिंडर तीनचाकी टेम्पोमधून, सिद्धनाथ गॅस सर्व्हिस या दुकानात खाली करण्यात येत होते. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर पुरवठा विभागाचे अधिकारी प्रशांत ओव्हाळ यांनी कारवाई केली होती.वाल्हेकरवाडीमध्ये बेकायदा साठा जप्तपिंपरी : लोकवस्तीच्या ठिकाणी धोकादायकरित्या गॅस रिफिलिंग प्रक्रिया, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर असलेला गॅस साठा एक प्रकारे बॉम्बस्फोटाचे केंद्रच ठरू शकते. अशी बेकायदा गॅस रिफिलिंग केंद्र शहरात ठिकठिकाणी सुरू आहेत. याबद्दलची तक्रार येताच, पुरवठा अधिकाºयांनी वाल्हेकरवाडीत एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग केंद्रावर बुधवारी सकाळी छापा टाकला. तेथे विविध कंपन्यांचे सुमारे ३०० सिलिंडर आढळून आले.अधिकाºयांनाच आपले कर्मचारी सुरक्षित आहेत का? असा उलट प्रश्न गॅस रिफिलिंग केंद्राशी संबंधित टोळक्याने उपस्थित केला. त्यामुळे कारवाई करण्याबाबत अधिकाºयांपुढे पेच निर्माण झाला. पुरवठा अधिकारी गणेश सोमवंशी वाल्हेकरवाडी येथे पोहोचले. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, एका पत्राशेडमध्ये गेले. तेथे मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर ठेवलेले आढळले. पोलीसही तेथे आले. सिलिंडर जप्तीची कारवाई केली. या गॅस रिफिलिंग केंद्राचा मालक कोण? याबद्दल कोणीच काही सांगत नव्हते.नायब तहसीलदार आणि पुरवठा अधिकाºयांशी हुज्जत घालणारा कोण होता? याची माहिती घेण्यात येत होती.अधिकाºयांना बांगड्यांचा आहेरछावा मराठा युवा महासंघाने २७ ला आंदोलन केले होते. घरगुती गॅसचा काळा बाजार होत असून पुरवठा विभागाच्या अधिकाºयांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. असा आरोप करून छावा मराठा युवा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार कार्यालयातील अधिकाºयांना बांगड्यांचा आहेर दिला होता. धनाजी येळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले होते़ त्याची गंभीर दखल घेत वाल्हेकरवाडीतील गॅस रिफिलिंग केंद्रावर बुधवारी अधिकाºयांनी कारवाई केली.गुन्हा दाखल करण्यास अडचणीवरिष्ठ पातळीवरून दबाव वाढू लागल्याने गुन्हा दाखल करण्यास अडचणी येऊ लागल्या. पुरवठा अधिकाºयांनी तक्रार दिल्यास गुन्हा नोंदविण्याची पोलिसांची तयारी आहे. अशी भूमिका पोलिसांनी घेतली तर पुरवठा अधिकाºयांनी सिलिंडर जप्तीची कारवाई केली, पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका पुरवठा अधिकारी व नायब तहसीलदारांनी घेतली.तुमचे कर्मचारीसुरक्षित आहेत का ?जप्त केलेला गॅस सिलिंडरचा साठा आकुर्डीतील तहसील कार्यालयाच्या आवारात नेण्यात आला. त्यानंतर मात्र वेगळेच चित्र अधिकारी आणि नागरिकांना पहावयास मिळाले. बंदूकधारी सहा बाऊन्सर घेऊन एक व्यक्ती तहसीलदार कार्यालयाजवळ दाखल झाली. कारवाई करण्याचे कारण काय? असा जाब त्या व्यक्तीने नायब तहसीलदार दिनेश तावरे यांना विचारला. अशा पद्धतीने गॅस सिलिंडरचा बेकायदा साठा करणे दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकते. या कारणास्तव कारवाई केली असल्याचे तावरे यांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करताय, तुमचे कर्मचारी सुरक्षित आहेत का? असा उलट प्रश्न करताच जमलेले नागरिक आश्चर्य व्यक्त करू लागले. या वेळी अधिकृत गॅस एजन्सीचे काही मालकही त्या ठिकाणी हजर झाले. आमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, असे सांगत त्यांनी जबाबदारी झटकली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे