शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कचरा पडेना, चॉकलेट मिळेना!, लोणावळा शहरात अस्वच्छता, मशिन पडल्या धूळ खात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 02:38 IST

लोणावळा शहरात मोठ्या थाटामाटात उद्घाटन करून बसविलेल्या कचरा मशिनची अवस्था ‘ना कचरा पडेना ना चॉकलेट मिळेना’ अशी झाल्याने या मशिन धूळ खात पडल्या आहेत.

लोणावळा : लोणावळा शहरात मोठ्या थाटामाटात उद्घाटन करून बसविलेल्या कचरा मशिनची अवस्था ‘ना कचरा पडेना ना चॉकलेट मिळेना’ अशी झाल्याने या मशिन धूळ खात पडल्या आहेत.मागील चार वर्षांपासून शहरात स्वच्छता मोहिमेचा मोठा गाजावाजा झाला. मुलांच्या चित्रकला व भित्तिचित्र स्पर्धा, जनजागृती रॅली, शाळांमध्ये योग्य प्रकारे कचरा संकलन करणाºया मुलांना गुण देणे, स्वच्छतेची शपथ असे नानाविध प्रकार करत कागदोपत्री शहर एकदम स्वच्छ झाल्याने महाराष्ट्रातील पहिल्या सहा नगर परिषदांमध्ये लोणावळा नगर परिषदेला स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले. वास्तव मात्र विपरीत आहे.शहरात कचरा उचलण्यासाठी कोट्यवधीचा ठेका दिलेला असताना जागोजागी कचºयांचे ढीग साचले आहेत. कचराकुंड्या भरभरून वाहत आहेत. कचरा उचलणाºया निम्म्याहून अधिक गाड्या बंद पडलेल्या असल्याने शहरात सर्वत्र स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याने नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. मुलांना व नागरिकांना कचºयाबाबत शिस्त लागावी याकरिता मागील वर्षी शहरातील मावळा पुतळा चौक, रायवुड कॉर्नर, भांगरवाडी यासह काही शाळांच्या बाहेर एक आगळे वेगळे मशिन लावण्यात आले. या मशिनचे थाटामाटात उद्घाटन झाले.या मशिनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कचरा टाकला की त्यामधून चॉकलेट बाहेर येणार हे होते. प्रत्यक्षात अनेक वेळा कचरा टाकला तरी चॉकलेट काही बाहेर न आल्याने शाळकरी मुलांनी या मशिनकडे काणाडोळा केला. त्यानंतर शाळांच्या बाहेरील मशिन इतरत्र हलविण्यात आली. सध्या या मशिन जागोजागी धूळ खात पडल्या आहेत. नगर परिषदेचे अधिकारी म्हणाले, की सदर मशिन ज्या संस्थेने बसवली त्यांनी मशिनकडे लक्ष न दिल्याने ही अवस्था झाली आहे.दर वर्षी नगर परिषद कोटी रुपये केवळ शहराच्या स्वच्छतेसाठी खर्च करत असताना स्वच्छतेचा केवळ फार्स होत असल्याने कचºयांचे पैसे नेमके कोणाच्या खिशात जात आहेत, असा प्रश्न लोणावळेकर उपस्थित करु लागले आहेत. पर्यटननगरीचे पर्यावरण स्वच्छच राहायला हवे, त्यासाठी नगर परिषदेने विशेष काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.कर्तव्यशून्यतेचा नारा देण्यात धन्यताशहराच्या मध्यवर्ती भागात कच-याची समस्या भयानक आहे. बाजारभाग, भांगरवाडी, वर्धमान सोसायटी, गावठाण, मुख्य रस्ते, रुग्णालयांच्या समोरील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने शहरात स्वच्छतेचे बारा वाजले असताना नगर परिषद मात्र ‘स्वच्छ लोणावळा व सुंदर लोणावळा’ हा कर्तव्यशून्य ठरलेला नारा देण्यात धन्यता मानत असल्याने नागरिक हैराण आहेत.

टॅग्स :Puneपुणे