शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश : बावीस हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 02:26 IST

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळालेल्या २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता पुढच्या फेरीतील गुणवत्ता यादीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे  - अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळालेल्या २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता पुढच्या फेरीतील गुणवत्ता यादीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरीत केवळ १७ हजार २११ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेतले.अकरावी प्रवेशासाठी ७५ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, त्यापैकी ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी दिलेल्या १० पसंती क्रमानुसार महाविद्यालय मिळाले होते. मात्र या ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांपैकी केवळ १७ हजार २११ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. बायफोकलच्या २ हजार ६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांना मात्र मिळालेले महाविद्यालय पसंत नसल्याने त्यांनी प्रवेश घेतलेला नाही. दरम्यान पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी एक दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. पहिल्या फेरीतील महाविद्यालयांचे कटआॅफ १० जुलैनंतर जाहीरकरण्यात येणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलात येतील. दुसºया फेरीची गुणवत्ता यादी १३ जुलै रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार १८९ इतकी आहे. या १७ हजार १८९ विद्यार्थ्यांना सोमवारी प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे, अन्यथा त्यांना प्रवेशाच्या सर्व फेºया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे.केंद्रीय आॅनलाइन प्रवेश नियंत्रण समितीतर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या इयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या पसंती क्रमाव्यतिरिक्त अन्य २ ते १० पर्यंतच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असल्यास त्यांना प्रवेशासाठी पुढील फेºयांमध्ये संधी उपलब्ध असणार आहे. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन रद्द केल्यास त्या विद्यार्थ्यांना ब्लॉक केले जाणार आहे.प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत मुदतवाढअकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी मंगळवार, दि. १० जुल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे काही कारणास्तव ज्यांना प्रवेश घेता आला नाही त्यांना मंगळवारी आणखी एक संधी आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांचा अर्ज प्रवेश प्रक्रियेतून बाद केला जाणार आहे. 

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी