शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी केले ' त्या 'महिलेवर अंत्यसंस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 20:11 IST

गेल्या काही दिवसांपासून शोभा यांचे मानसिक संतुलन बिघडले होते...

ठळक मुद्देचिंचवड येथे नदीपात्रात सापडला होता मृतदेह 

पिंपरी : मानसिक संतुलन बिघडलेल्या महिलेचा मृतदेह चिंचवडला थेरगाव घाटालगत नदीपात्रात आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन करून पोलिसांनी देखील तपास सुरू केला. अखेर तिच्या घराचा शोध लागला. मात्र मुलबाळ नसल्याने ती एकटीच रहात असल्याची माहितीसमोर आली. वेडाच्या भरात पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यानंतर तिच्या मावशीच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने  पोलिसांनीच महिलेवर अंत्यसंस्कार केले.शोभा सुभाष टेके (वय ५५, रा. चिंचवडे नगर, चिंचवड) असे मृत महिलेचे नाव आहे. शोभा टेके या गेल्या काही वर्षांपासून चिंचवडे नगर येथे राहूल भोईर यांच्या चाळीत भाडेतत्वावरील घरात राहण्यास होती. शोभा लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. तसेच १५ वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. मूलबाळ नसल्याने त्या एकट्याच रहात होत्या. मात्र त्यांची मावशी त्यांच्या घरी येत असे. गेल्या काही दिवसांपासून शोभा यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यामुळे सतत बाहेर फिरत असत. दरम्यान शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराजवळ थेरगाव घाटाच्या लगत एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यांनी अग्निशामक दलाला याबाबत कळविले. त्यानुसार अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर महापालिकेच्या पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. तसेच महिलेच्या नातेवाईकांचा चिंचवड परिसरात शोध घेण्यात आला. त्यांच्या घराचा शोध लागला. तो मृतदेह शोभा टेके यांचा असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांना मूलबाळ नसल्याने इतर नातेवाईकांचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना मावशी असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या मावशीला बोलावून घेऊन मृतदेहाची ओळख करून घेतली. शोभा टेके यांचा मृतदेह असल्याचे मावशीने सांगितले. वेडाच्या भरात पाण्यात पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असेही मावशीने सांगितले. त्यानंतर मृतदेह मावशीच्या ताब्यात देण्यात आला. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही नातेवाईक नसल्याने अंत्यसंस्कार करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र पानसरे यांनी काही सामाजिक कार्यकत्यांच्या मदतीने लिंक रोड, चिंचवड येथील स्मशानभूमीत मावशीच्या उपस्थितीत शोभा टेके यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यूWomenमहिला