शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
4
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
5
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
6
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
7
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
8
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
9
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
10
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
11
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
12
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
13
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
14
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
15
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
16
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
17
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
18
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
19
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
20
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर

पिंपरीत तलवारीचा धाक दाखवून पळविली चारचाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 4:03 PM

उद्योगनगरीत वाहनचोरीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. वाहनचोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून येते. तलवारीचा धाक दाखवून चारचाकी वाहन पळवून नेल्याची घटना थरमॅक्स चौकात घडली आहे.

पिंपरी : उद्योगनगरीत वाहनचोरीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. वाहनचोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून येते. तलवारीचा धाक दाखवून चारचाकी वाहन पळवून नेल्याची घटना थरमॅक्स चौकात घडली आहे. तसेच शहर परिसरातून चार दुचाकींची चोरी झाली आहे. चार लाखांची पाच वाहने चोरी झाल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये रविवारी (दि. 22) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहनचोरीच्या या प्रकारांमुळे वाहनचालक व मालकांमध्ये घबराट आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन लाख रुपये किमतीच्या चारचाकी वाहन चोरीचा प्रकार थरमॅक्स चौकात रविवारी (दि. 22) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला. याप्रकरणी शिवाजी आप्पासाहेब देवकाते (वय 29, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जबरी चोरी केल्याप्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‍ फिर्यादी देवकाते त्यांच्या  चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला पार्क करून वाहनात झोपले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी देवकाते यांना शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तलवारीचा धाक दाखवून देवकाते यांचे चारचाकी वाहन पळवून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.वाहन चोरीचा दुसरा प्रकार विजयनगर, काळेवाडी येथे 16 डिसेंबर रोजी घडला. याप्रकरणी चेतन दिलीप पाटील (वय 23, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 50 हजारांची दुचाकी त्यांच्या घरासमोर लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.वाहन चोरीचा तिसरा प्रकार वाकड येथे बुधवारी (दि. 18) रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. याप्रकरणी श्रीशैल नागनाथ कोळी (वय 24, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कोळी यांनी त्यांची 28 हजार रुपये किमतीची दुचाकी दुकानाबाहेरील जागेत पार्क केली होती. त्यानंतर फिर्यादी कोळी स्वयंपाक करण्याच्या गडबडीत होते. जेवण झाल्यानंतर मित्र राजकुमार प्रकाश मेहेत्रे याला रात्री दुकानात झोपण्याचे सांगून फिर्यादी कोळी रात्री साडेअकराच्या सुमारास घरी जाण्यासाठि निघाले. त्यावेळी दुकानाबाहेर त्यांची दुचाकी दुकानाबाहेर दिसून आली नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.वाहन चोरीचा चौथा प्रकार चिचवड येथे शुक्रवारी (दि. 20) रात्री 11 ते शनिवारी (दि. 21) पहाटे पाचच्या दरम्यान घडला. याप्रकरणी सुमित राजू कांबळे (वय 27, रा. चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कांबळे यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी राहत्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुराची दुचाकी पळविलीरस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुराची दुचाकी चोरी करून नेल्याचा प्रकार चाकण ते तळेगाव रस्त्यावरील वाघजाईनगरच्या हद्दीत मंगळवारी (दि. 17) रात्री 9 ते बुधवारी (दि. 18) सकाळी सहाच्या दरम्यान घडला. याप्रकरणी लतीफ बालमभाई पठाण (वय 30, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पठाण बिगारी असून, मजुरीचे काम करतात. ते मंगळवारी रात्री वाघजाईनगरच्या हद्दीतील फोर्जिंग कंपनीजवळ रस्त्याच्या कडेला झोपले होते. त्यावेळी त्यांनी तेथे त्यांची 11 हजार रुपये किमतीची दुचाकी पार्क केलेली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकी पळवून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीfour wheelerफोर व्हीलर