शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

तळवडेत दुभाजकाला धडकून चारचाकी उलटली; सीटबेल्टमुळे चालकाचे वाचले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 11:55 IST

तळवडे महाळुंगे एम आय डी सी मार्गावर महाळुंगे (इंगळे) एमआयडीसी हद्दीत सकाळी ७.३० वाजता भरधाव वेगात असणारी चारचाकी दुभाजकाला धडकून चारही चाके वरती होऊन पलटी झाली.

ठळक मुद्देडांबरीकरणाचे काम चालू असल्याने सर्व खडी रस्त्यावर विखुरली असल्याने घसरत आहेत वाहनेबेटलर कंपनीच्या २५ ते ३० कर्मचाऱ्यांनी गाडी उचलून सरळ करून घेतली रस्त्याच्या कडेला

रावेत : तळवडे महाळुंगे एम आय डी सी मार्गावर महाळुंगे (इंगळे) एमआयडीसी हद्दीत सकाळी ७.३० वाजता भरधाव वेगात असणारी चारचाकी (एमएच १४ डीएक्स ३४१७) दुभाजकाला धडकून चारही चाके वरती होऊन पलटी झाली. सुदैवाने वाहन चालकाला कसलीही इजा झाली नाही. सकाळच्या वेळी वाहतूक तुरळक असल्याने या मार्गावरून धावणारी वाहने भरधाव वेगात असतात. त्यातच या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम चालू असल्याने सर्व खडी रस्त्यावर विखुरली असल्याने वाहने घसरत आहेत. सकाळी वेगात असणारी वॅगनर या खडीवरून घसरून समोरील डाव्या बाजूचा टायर फुटला व वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व गाडी दुभाजकाला धडकून काही अंतरावर जाऊन पलटी झाली. मागे मोठे वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. याच मार्गावरून विरुद्ध दिशेने बेटलर कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या बस मधील कर्मचाऱ्यांनी ही घटना पहिल्यानंतर गाडीत अडकलेल्या वाहन चालकाला बाहेर काढले व २५ ते ३० कर्मचाऱ्यांनी गाडी उचलून सरळ करून रस्त्याच्या कडेला घेतली.या अपघातामुळे या मार्गावर तुरळक प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.

सीट बेल्ट मुळे वाचले प्राणभरधाव वेगात असणाऱ्या चारचाकीच्या वाहन चालकाने वाहन चालविताना सीट बेल्ट लावल्यामुळे या मोठ्या अपघातात त्याला खरचटले सुद्धा नाही. घटनास्थळी गाडीची अवस्था पाहता निश्चितच यातील प्रवाशी गंभीर जखमी झाले असावेत, असे वाटत होते. परंतु चालक सर्वांशी बोलत असल्याचे पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले. नशीब बलवत्तर आणि वाहन चालविताना लावलेला सीट बेल्ट यामुळे वाहन चालकाचे प्राण वाचले.

टॅग्स :Accidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड