शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

मांडूळाची तस्करी करणारे चौघे वाकड पोलिसांच्या जाळ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 20:19 IST

तस्करीसाठी आणलेले मांडूळ जातीचे साप विकण्यासाठी निघालेल्या चौघांना वाकड पोलीस तपास पथकाने रंगेहाथ पकडले. तीन मांडूळ जप्त केले तर चौघांवर वन्य जीव प्राणी संरक्षण कायद्यान्वये १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देतीन मांडूळ जप्त, चौघांवर वन्य जीव प्राणी संरक्षण कायद्यान्वये १९७२ अन्वये गुन्हा दाखल पालकांना आपल्या पाल्यांचा असा ‘पराक्रम ’ पाहून  अश्रू अनावर

वाकड : तस्करीसाठी आणलेले मांडूळ जातीचे साप विकण्यासाठी निघालेल्या चौघांना वाकड पोलीस तपास पथकाने रंगेहाथ पकडून तीन मांडूळ जप्त केले तर चौघांवर वन्य जीव प्राणी संरक्षण कायद्यान्वये १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर अरुण राठोड (वय १९), बाबासाहेब वसंत राठोड (वय २१), भीमराव नरसप्पा जाधव (वय २२, रा. तिघेही काळाखडक झोपडपट्टी वाकड ), सागर चंद्रकांत घुगे (वय २२, रा रघुनंदन कायार्लायशेजारी, ताथवडे) या चौघांना पोलिसांनी मांडुळासह वाकड येथील मुंजोबा मंदिराच्या मागे अटक केली आहे. याबाबत महिती अशी वाकड पोलीस ठाणे तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हद्दीत दिवसा घटफोडी,चोरी, वाहनचोरी व सोनसाखळी चोरी आदी गुन्ह्यास प्रतिबंध व्हावा यासाठी खाजगी वाहनाने गस्त घालत असताना पोलीस नाईक राजेश बारशिंगे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की मुंजोबा वसाहत येथील मुंजोबा मंदिरामागे मांडूळ नावाच्या सापाची विक्री करण्यास येणार आहेत. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक हरीष माने व तपास पथकातील कर्मचारी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तीन इसम संशयितरित्या थांबल्याचे दिसले. तर यापैकी एकाच्या हातात पोते होते. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली व पोत्याची पाहणी केली असता त्यात तीन मांडूळ आढळून आली. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता ते  मांडूळ त्यांनी विकण्यासाठी आणल्याचे कबूल केले. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक हरीष माने, राजेश बरशिंगे, अशोक दुधवणे, बापू धुमाळ, रमेश गायकवाड, विक्रांत गायकवाड, भैरोबा यादव, विजय गंभीरे, श्याम बाबा यांच्या पथकाने केली......................   मांडूळ वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्यान्वये १९७२ अंतर्गत शेड्युल तीन मधील प्राणी आहे तो नामशेष होत असल्याने त्याचे जतन व्हावे म्हणुन तरतूद करण्यात आली आहे. मांडूळ सापाबाबत बरेच गैररसमज व अंधश्रद्धा समाजात प्रचलित आहे. तसेच मांडूळ पैशांचा पाऊस पाडते.त्यानुसार या अंधश्रद्धेच्या जगतात लाखो रुपयांची किंमत मोजली जाते. अशा अनेक तस्करी टोळ्या सक्रिय आहेत. मध्यंतरी पोलिसांच्या कारवाई सत्रामूळे ह्या टोळ्या भूमिगत झाल्या होत्या. मात्र, हळूहळू ते आता तोंड वर काढून सक्रिय होत आहेत. अटक झालेली सर्व आरोपी सर्व सामान्य  गरीब कुटुंबातील आहे. तसेच त्यांचे पालकांना आपल्या पाल्यांचा असा ‘पराक्रम ’ पाहून  अश्रू अनावर झाले. 

टॅग्स :wakadवाकडCrimeगुन्हाPoliceपोलिस