रोकडसह ४५ हजारांचे चार मोबाइल केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 04:34 PM2020-02-22T16:34:00+5:302020-02-22T16:36:40+5:30

प्रवासादरम्यान प्रवाशांचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरीच प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन महिला तसेच वृद्धांकडील रोकड, दागिने लंपास केले जातात. अशाच पद्धतीने आळंदी-पुणे मार्गावरील देहूफाटा चौकात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणीचा मोबाइल चोरीला गेला आहे.

Four mobile stolen at Pimpri | रोकडसह ४५ हजारांचे चार मोबाइल केले लंपास

रोकडसह ४५ हजारांचे चार मोबाइल केले लंपास

Next

 : बंद दरवाजा कशाच्या तरी साह्याने उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून रोकडसह चार मोबाइल असा एकूण ४५ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. साईनाथनगर, निगडी येथे शुक्रवारी पहाटे अडीच ते सव्वातीनच्या दरम्यान हा प्रकार घडला.
समाधान राजेंद्र कदम (वय २५, रा. साईनाथनगर, निगडी, मुळगाव शिवनी (लख), ता. औसा, जि. लातूर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कदम यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी साह्याने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. घरातील १८ हजार ३०० रुपयांच्या रोकडसह २७ हजारांचे चार वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाइल असा एकूण ४५ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

बसथांब्यावरून तरुणीचा मोबाइल लंपास

प्रवासादरम्यान प्रवाशांचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरीच प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन महिला तसेच वृद्धांकडील रोकड, दागिने लंपास केले जातात. अशाच पद्धतीने आळंदी-पुणे मार्गावरील देहूफाटा चौकात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणीचा मोबाइल चोरीला गेला आहे.
आकांक्षा अनिल पाटील (वय २०, रा. देहूफाटा, पुणे, मूळ रा. आनंदनगर, खामला, नागपूर) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकांक्षा पाटील शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आळंदी-पुणे मार्गावर देहूफाटा चौकात बसथांब्यावर बसची प्रतीक्षा करीत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांचा आठ हजार रुपये किमीतचा मोबाइल चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Four mobile stolen at Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.