शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलात्काराच्या चार घटना उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 15:06 IST

सांगवी पोलीस ठाण्यात चार बलात्काराच्या घटनांची नोंद झाली असून त्यातील पीडितांमध्ये दोन महिला वयाच्या चाळीशी ओलांडलेल्या आहेत तर दोन मुली अल्पवयीन आहेत. एकाच वेळी चार घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसांगवी पोलीस ठाण्यात चार बलात्काराच्या घटनांची नोंदपीडितांमध्ये दोन महिला वयाच्या चाळीशी ओलांडलेल्या तर दोन मुली अल्पवयीन

पिंपरी : सांगवी पोलीस ठाण्यात चार बलात्काराच्या घटनांची नोंद झाली असून त्यातील पीडितांमध्ये दोन महिला वयाच्या चाळीशी ओलांडलेल्या आहेत तर दोन मुली अल्पवयीन आहेत. एकाच वेळी चार घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पिंपळेनिलख येथे राहणाऱ्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपी मूळचा नाशिक येथील असून संतोष महाले असे त्याचे नाव आहे. २००८ पासून तो पीडित महिलेच्या संपर्कात होता. लग्नाचे आमिष दाखवून नाशिक, गुजरात येथील लॉजमध्ये त्याने तिच्यावर जबरदस्ती केली.एवढेच नव्हे तर तिच्याकडून ६ लाख ५० हजार रुपये आणि १६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल नेला. सांगवी पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार नोंदविली आहे. दुसऱ्या घटनेत ताडीवाला रोड येथील आरोपी गणेश मारूती म्हस्के याने पिंपळे सौदागर येथे कालनीत भाड्याने राहणाऱ्या १७ वर्षे वयाच्या तरूणीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. आॅगस्ट २०१७ला आरोपी तरूणीच्या आईला भेटण्यासाठी आला. पीडित तरूणीची आई, भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते. तरूणी एकटीच घरी होती. त्यावेळी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिला कात्रज येथील लॉजवर नेले. तेथेही तिच्यावर अत्याचार केला. तिसऱ्या घटनेत नाशिकफाटा कासारवाडी येथे गप्पा मारण्यासाठी बोलावून आरोपीने १४ वर्षे वयाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. पिंपळेगुरव येथील अल्पवयीन मुलीला घोलपूर, राजस्थान येथे नेले. तेथे त्याचा भाऊ तसेच मेहुणा यांच्याकडे १५ दिवस ठेवले. तेथेही तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आले. इच्छेविरूद्ध तिच्यावर शारीरिक संबंध ठेवले. मुलगी गरोदर राहिल्यानंतर आठ महिन्यांनी ही बाब उघडकीस आली आहे. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार अजय या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फिर्याद बालकांचे संगोपन करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकारी महिलेने दिली आहे. पिंपळेगुरव येथील आणखी एका अल्पवयीन मुलीवर तिची आई घरात नसताना, नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीची आई कामावरून  घरी परत आली त्यावेळी घराला आतून कडी लावलेली होती. दरवाजा उघडला, त्यावेळी घरात मुलगी आणि आरोपी होता. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता, आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याचे सांगितले. हरी गोविंद राठोड या आरोपीविरूगद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड