पिंपरी : सावत्र पित्याकडून मुलींवर अत्याचार; सांगवी पोलिसांकडे फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 09:49 PM2017-12-29T21:49:23+5:302017-12-29T21:51:09+5:30

पिंपरी : सावत्र पित्याकडून दोन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, अल्पवयीन मुलीने नराधम पित्याविरुद्ध सांगवी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. अद्याप त्यास अटक केलेली नाही. 

Pimpri: Atrocities against girls from stepfather; Complaint against Sangvi police | पिंपरी : सावत्र पित्याकडून मुलींवर अत्याचार; सांगवी पोलिसांकडे फिर्याद

पिंपरी : सावत्र पित्याकडून मुलींवर अत्याचार; सांगवी पोलिसांकडे फिर्याद

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपीने पिंपळे गुरव येथे राहाणा-या त्याच्या दोन सावत्र मुलींवर लैंगिक अत्याचार केले

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : सावत्र पित्याकडून दोन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, अल्पवयीन मुलीने नराधम पित्याविरुद्ध सांगवी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. अद्याप त्यास अटक केलेली नाही. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी अड्डा खडकी येथे रहाणा-या आरोपीने पिंपळे गुरव येथे राहाणा-या त्याच्या दोन सावत्र मुलींवर लैंगिक अत्याचार केले. २८ डिसेंबरला थोरल्या बहिणीवर नराधम पित्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिची अर्धनग्न अवस्थेतील छायाचित्र मोबाइलवर काढली. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली. दोन वर्षांपूर्वीही आरोपीने तिच्यावर अशाच प्रकारे अत्याचार केले होते. १ आॅक्टोबर २०१७ ते अद्यापपर्यंत दुस-या १५ वर्षांच्या छोट्या मुलीवर हा नराधम पिता अत्याचार करीत होता. पित्याच्या या कृत्याने हैराण झालेल्या मुलीने थेट सांगवी पोलीस ठाणे गाठले. तेथे जाऊन घडलेला प्रसंग कथन केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग, बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार आणि धमकावणे असे विविध गुन्हे दाखल केले आहेत. सावत्र पित्याकडून स्वत:च्या मुलींवर अत्याचार केल्याच्या घटना यापूर्वीही सांगवी, आणि पिंपळे गुरव परिसरात घडल्या आहेत. 
 

Web Title: Pimpri: Atrocities against girls from stepfather; Complaint against Sangvi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.