वाकड : आयटी पार्क वसलेले आणि हायटेक ग्रामपंचायत अशी ख्याती मिळविलेल्या माण (मुळशी) गावात मध्यरात्री चार घरफोड्या झाल्या चोरट्यांनी कुलूप असलेल्या घरांना लक्ष्य करीत काही रोख रक्कम व किरकोळ वस्तू पळविल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र काय वस्तू, मुद्देमाल व रोख रक्कम किती याचा ठोस आकडा पोलिसांच्या हाती लागला नाही. ग्रामपंचायती शेजारील वाघुलकरांचे दोन घरांचे आणि खोले चाळीतील दोन भाडेकरूंच्या दोन खोल्यांचे कुलूप तोडून व कडी-कोयंडा उचकटू चोरट्यांनी प्रवेश करीत घरफोड्या केल्या. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत. मान-हिंजवडी भागात वाढत्या औद्योगिकीरणामुळे रोजगारासाठी बाहेरून आलेला मोठा कामगार वर्ग चाळ्यांमध्ये वास्तव्यास आहे. मात्र हे कामगार तीन शिफ्ट मध्ये काम करीत असल्याने पाळत ठेवून चोर योजना आखत आहेत.
मुळशीतील आयटी पार्क असलेल्या माण गावात चार घरफोड्या; बंद घरे लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 12:54 IST
माण (मुळशी) गावात मध्यरात्री चार घरफोड्या झाल्या चोरट्यांनी कुलूप असलेल्या घरांना लक्ष्य करीत काही रोख रक्कम व किरकोळ वस्तू पळविल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुळशीतील आयटी पार्क असलेल्या माण गावात चार घरफोड्या; बंद घरे लक्ष्य
ठळक मुद्देकुलूप असलेल्या घरांना लक्ष्य करीत रोख रक्कम, किरकोळ वस्तू पळविल्याची प्राथमिक माहितीसीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तपासास सुरूवात