शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

परदेशी..परदेशी जाना नही! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ नव्या स्ट्रेनचा प्रवाशांनी घेतला धसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 14:43 IST

पासपोर्टच्या अर्जांचे प्रमाण निम्म्याने घटले

नारायण बडगुजर- पिंपरी : कोरोनाची दुसरी लाट व त्यापाठोपाठ ब्रिटनमधील नवीन स्ट्रेनमुळे जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. भारतीयांनी देखील त्याचा धसका घेतला आहे. त्यामुळे परदेशात जाण्याचे टाळले जात आहे. परिणामी नवीन पारपत्र अर्थात पासपोर्ट घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पडताळणी विभागाकडून गेल्या वर्षी ३२,६६४ तर २०१९ मध्ये ६७,५३० पासपोर्ट अर्जांची पडताळणी करण्यात आली.

परदेशवारी करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून कोरोना विषाणूंचा भारतात शिरकाव झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्यावर्षी मार्चपासून लाॅकडाऊन करण्यात आला. त्यामुळे देशातील विमानसेवा बंद करण्यात आली होती. मात्र लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर पासपोर्टसाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली. उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातून हजारो नागरिक दरवर्षी परदेशवारी करतात. तसेच लाखो नागरिक पासपोर्टसाठी अर्ज करतात. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर त्यात वाढ झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी संख्येने अर्ज प्राप्त होत आहेत. हे प्रमाण निम्म्यावर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ ऑग़स्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाल्यानंतर विशेष शाखेअंतर्गत पडताळणी विभागाचे कामकाज सुरू झाले.पासपोर्टसाठीची प्रक्रिया ऑनलाईन असली तरी नागरिकांकडून अर्ज करण्याचे प्रमाण कमी आहे. गेल्यावर्षी जानेवारीमध्ये सर्वाधिक ६९३७ पासपोर्ट अर्ज होते. लाॅकडाऊन दरम्यान एप्रिलमध्ये केवळ एक तसेच मेमध्ये २३ तर अनलाॅक झाल्यानंतर त्यात वाढ होत असून, डिसेंमध्ये ३९१३ अर्ज प्राप्त झाले होते.ब्रिटनमधील लाॅकडाऊनमुळे चिंताकोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे ब्रिटनमध्ये लाॅकडाऊन केला आहे. तसेच ब्रिटन येथून भारतात परतलेल्या काही प्रवाशांमध्ये नवीन स्ट्रेन आढळून आला. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून, परदेशात जाण्याच्या तयारीतील भारतीय सतर्क झाले आहेत. अत्यावश्यक काम असेल तरच विमान प्रवास करायचा तसेच कोरोनाचा धोका नसलेल्या देशांतच जाण्याला पसंती दिली जात आहे.------------------------पासपोर्ट अर्ज पडताळणी (२०२०)जानेवारी ६९३४फेब्रुवारी ५८२७मार्च ३७५५एप्रिल १मे २३जून ९८४जुलै १२८२ऑगस्ट १९१४सप्टेंबर २६२७आक्टोबर २९०१नोव्हेंबर २५०३डिसेंबर ३९१३एकूण ३२६६४---------------------------वर्ष अर्ज२०१८ - १९१४२२०१९ - ६७५३०२०२० - ३२६६४

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpassportपासपोर्टpassengerप्रवासीcorona virusकोरोना वायरस बातम्या