शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

लक्ष्मण जगताप यांच्या आश्वासनानंतर वाल्हेकर वाडीतील बाधितांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 17:18 IST

आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांच्या घराच्या बाबतीत असणारी मागणी संबंधित प्रशासनाशी चर्चा करून सोडविण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी उपोषण अखेर शुक्रवारी संध्याकाळी मागे घेतले.

ठळक मुद्देआमदार जगताप यांनी बाधितांची मागणी चर्चा करून सोडविण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागेवाल्हेकरवाडी-रावेत या मार्गावरील काही घरे जाणार रस्त्यात

रावेत : गेल्या ५ दिवसांपासून रस्त्यातील बाधित घर वाचविण्याच्या मागणीसाठी वाल्हेकर वाडीतील दत्त मंदिरासमोर बाधितांनी आमरण उपोषण सुरू केले होते. आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांच्या घराच्या बाबतीत असणारी मागणी संबंधित प्रशासनाशी चर्चा करून सोडविण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी उपोषण अखेर शुक्रवारी संध्याकाळी मागे घेतले.वाल्हेकरवाडी-रावेत या मार्गावरील काही घरे रस्त्यात जाणार आहेत. ही घरे वाचावीत अथवा घराच्या बदल्यात घर अथवा जागा प्रशासनाने द्यावे या मागणी करिता सुरू असलेले आमरण उपोषण ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेविका करुणा चिंचवडे, माजी नगरसेवक शामराव वाल्हेकर, शिवसेनेचे सल्लागार भगवान वाल्हेकर, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर चिंचवडे, चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, हेमंत ननवरे, बिभिषण चौधरी, रामदास केंदळे आदींच्या उपस्थित उपोषण मागे घेतले.मागील दोन वर्षापासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतच्या भागाचे रस्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचे भूसंपादन झाले नसल्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. रस्ता-रुंदीकरणामध्ये जाणारी काही  बैठी घरे बाधित  होत आहेत. त्या घरांना खाली करण्याच्या प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यावर बधितांनी आम्ही १९६५ मध्ये ग्रामपंचायतची परवानगी घेऊन घरे बांधली आहेत ही आमची घरे अनधिकृत व रस्ता बाधित कसे ठरतात या बाबत आम्हाला प्रशासनाने न्याय द्यावा व आम्हाला घराच्या बदल्यात घरे द्यावीत या मागणी करिता वाल्हेकरवाडी येथील नागरिकांनी उपोषण सुरू केले होते. शशिकांत खाडे, प्रवीण देशमुख, अरुण देशमुख, पोपट खडतरे, बाळासाहेब गुळुंजकर, शरद पवार, हसीना शेख, शारदा नाईकनवरे, कमल शिंपी, मंदा सरोदे, माधुरी वायकर, नदाफ पठाण, शोभा इंगळे आदी आमरण उपोषण करीत होत. नामदेव ढाके, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, सचिन शिवले, नाना मरळ, छावाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील आदींनी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड