शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्यानेच केला पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 19:57 IST

मुलीच्या आईने पतीच्या हालचालींवर नजर ठेवली असता पती मुलीसोबत गैरवर्तन करत असल्याचे आढळून आले. ही घटना बावधन येथे २६ ते २७ जून २०१९ या कालावधीत घडली.

ठळक मुद्देजन्मदात्यानेच केला पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचारहिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : चिमुकलीला गंभीर दुखापत

पिंपरी : पाच वर्षीय चिमुकलीच्या पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मुलीच्या लैंगिक अवयवास गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगितले. त्यावर मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता वडिलांनी तिच्याशी गैरवर्तन केल्याचे मुलीने सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने पतीच्या हालचालींवर नजर ठेवली असता पती मुलीसोबत गैरवर्तन करत असल्याचे आढळून आले. ही घटना बावधन येथे २६ ते २७ जून २०१९ या कालावधीत घडली. याप्रकरणी चिमुकलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीडित मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षीय चिमुकलीच्या पोटात अचानक दुखू लागले. उपचारासाठी आईने मुलीला रुग्णालयात दाखल केले. मुलीवर उपचार करतेवेळी तिच्या लैगिंक अवयवांना गंभीर दुखापत झाली असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्याची कल्पना डॉक्टरांनी मुलीच्या आईला दिली. यावर मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावर वडिलांनीच मुलीशी गैरवर्तन केले असल्याचे मुलीने सांगतिले. याची खात्री करण्यासाठी फिर्यादी महिला यांनी रात्री झोपेचे सोंग घेत पतीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली. त्यावेळी आरोपी हा मुलीशी अश्लील चाळे करत असल्याचे त्यांना दिसले. याबाबत पतीला जाब विचारला असता फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी याने आपल्या अल्पवयीन मुलीशीच गैरवर्तन करत तिला गंभीर दुखापत केली. याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर तपास करत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारsexual harassmentलैंगिक छळ