शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीत पाचशे कोटींचे विषय मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 17:36 IST

विषयपत्रिकेवर सुमारे ३० कोटी रुपये खर्चाचे २६ प्रस्ताव

ठळक मुद्देस्थायी समिती सभागृहात सभा; रस्ते सफाईचा विषय आलाच नाहीदोन गटात वाद उद्भवू नये यासाठी पालिकेत सुरक्षारक्षक असताना चक्क पोलिस बंदोबस्त

पिंपरी : महापालिका स्थायी समितीचा कालखंड महिनाअखेरीस पूर्ण होत असल्याने शुक्रवारी झालेल्या शेवटच्या सभेत सुमारे ५३८ कोटींचे विषय मंजूर करण्यात आले. अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. शेवटची सभा असल्याने स्थायी समितीचा रात्रीस खेळ सुरू होता.  महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील स्थायी समिती सभागृहात सायंकाळी साडेसहाला सभा सुरू झाली. ती रात्री नऊ वाजेपर्यंत चालू होती. विषयपत्रिकेवर सुमारे ३० कोटी रुपये खर्चाचे २६ प्रस्ताव होते. शेवटची सभा असल्याने अधिकाधिक विषय आणण्यावर समितीचा भर होता. या सभेत अवलोकनाचे १२, प्रशासनाकडून अवलोकनाचे ७, मान्यतेचे १०३, प्रशासकीय मान्यतेचे ३२, सल्लागारांचे ८ असे एकुण १६२ विषय आिण ५३८ कोटींच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. त्यात ऐनवेळेसचे विषय अधिक होते. रस्ते सफाईचा विषय आलाच नाहीस्थायी समिती सभेत ऐनवेळी मोठ्या संख्येने प्रस्ताव दाखल करून घेतले. तसेच यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईच्या वादग्रस्त विषय शेवटच्या सभेत येणार याबाबत चर्चा होती. तसेच हा विषय येऊ नये, यासाठी भाजपातील एका गटाने खोडा घातला होता. यावरून दोन गटात वाद उद्भवू नये, यासाठी पालिकेत सुरक्षारक्षक असताना चक्क पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. पिंपरी पोलीस ठाण्याचे साध्या वेषातील पाच पोलिस कर्मचारी आणि एक उपनिरीक्षक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील स्थायी समिती बैठकीच्या दालनाबाहेर खडा पहारा देत होते. कचºयाचा विषय होणार नाही, असे समजल्यावर पोलीस बंदोबस्त काढून घेण्यात आला.

स्थापत्यविषयक कामांचे विषय अधिकशेवटच्या स्थायी समितीत स्थापत्यविषयक कामांचे विषय अधिक प्रमाणावर मंजूर करण्यात आले. त्यात डांबरीकरण, सिमेंट क्रॉक्रिटीकरणाचे विषय अधिक होते. पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचे विषय निविदा प्रक्रियेत अडकल्याने आणि भाजपातच आडवा आणि जिरवा धोरण सुरू असल्याने शेवटपर्यंत प्रयत्न करूनही विषय आणण्यात अपयश आले.

महत्वाचे विषय१) मोशीतील रस्ते विकसित करणे -१० कोटी२) बोºहाडेवस्ती येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणे-१२ कोटी३) वायसीएम हॉस्पिटल चाणक्य विभाग दुरूस्ती -१० कोटी४) चापेकर चौक चिंचवड अर्बनस्ट्रीट - ७.२५ कोटी५) वायसीएम रूण्णालयातील डॉक्टर निवास स्थान-१० कोटी६) पिंपरी ते चिंचवड लिंक रोड अर्बन स्ट्रिट- १२ कोटी.७) बर्ड व्हॅली संभाजीनगर लेझर शो- १० कोट७० लाख           

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड