शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत गोळीबार; महिला बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 02:17 IST

एच़ ए़ कंपनी वसाहतीत एका महिलेवर गोळीबार झाला. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास एच. ए. शाळेजवळ घडली. महिलेच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या.

पिंपरी - एच़ ए़ कंपनी वसाहतीत एका महिलेवर गोळीबार झाला. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास एच. ए. शाळेजवळ घडली. महिलेच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. दोन्ही गोळ्या बाजूने गेल्या. शीतल फिलिप सिकंदर (वय ३५, रा. गांधीनगर, पिंपरी) असे त्या महिलेचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.अ‍ॅड. सुशील मंचरकर यांच्या विरोधात यापूर्वी महिलेने एका प्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदविलेली आहे. त्या कारणावरुन मंचरकर फिर्यादी महिलेला नेहमी धमकावत असे. यातूनच हा हल्ला झाला असल्याचे फिर्यादी महिलेने सांगितले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.मुलगा दहावीच्या परीक्षेत पास झाला, म्हणून एच़ ए़ स्कूल जवळ असलेल्या मिठाईच्या दुकानातून पेढे आणण्यासाठी ही महिला मैत्रिणीबरोबर गेली. एकच्या सुमारास पेढे घेऊन पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तिच्या दिशेने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. आरोपीचा नेम चुकल्याने गोळ्या बाजूने गेल्या. महिलेला इजा पोहोचली नाही. येथे मोठ्याने आरडाओरडा सुरू झाला. पकडले जाण्याची शक्यता लक्षात येताच दोन्ही आरोपींनी दुचाकीवरून तेथून पलायन केले. बेशुद्धावस्थेतील महिलेला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले.पोलिसांनी कोणावर संशय आहे, का याबद्दल विचारणा केली. घटना कशामुळे घडली. याची माहिती घेतली. त्या वेळी महिलेने जुन्या एका प्रकरणाचा संदर्भ देत गोळीबाराच्या घटनेत मंचरकर यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला. सायंकाळी उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. अखेर रात्री साडेआठच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड