शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फायर ‘एनओसी’ आॅनलाइन, सप्टेंबरअखेर कार्यवाहीला होणार सुरूवात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 03:16 IST

बांधकाम करण्यासाठी अग्निशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, हे प्रमाणपत्र, दाखला मिळविण्यासाठी नागरिकांना अनेक दिव्यातून जावे लागत होते. मात्र, फायर एनओसीसाठी आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत चकरा माराव्या लागणार नाहीत. महापालिका ना हरकत दाखला आॅनलाइन उपलब्ध करून देणार आहे. सप्टेंबरअखेर ना हरकत दाखला आॅनलाइन देण्यास सुरुवात होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी दिली.

पिंपरी : बांधकाम करण्यासाठी अग्निशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, हे प्रमाणपत्र, दाखला मिळविण्यासाठी नागरिकांना अनेक दिव्यातून जावे लागत होते. मात्र, फायर एनओसीसाठी आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत चकरा माराव्या लागणार नाहीत. महापालिका ना हरकत दाखला आॅनलाइन उपलब्ध करून देणार आहे. सप्टेंबरअखेर ना हरकत दाखला आॅनलाइन देण्यास सुरुवात होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात बांधकाम करायचे झाल्यास महापालिकेच्या अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. कोणतेही बांधकाम करण्यासाठी अग्निशामक विभागाचा ना हरकत दाखला आवश्यक असतो. त्यासाठी बांधकाम व्यावसायिक, घर बांधणारे नागरिक अग्निशामक विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रसाठी पालिकेकडे अर्ज करत होते. त्यानंतर तो अर्ज पालिकेच्या अग्निशामक विभागाकडे जात होता. अग्निशमक दलाचे मुख्य अधिकारी जागेची पाहणी करत होते. त्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकाला प्रोव्हिजनल ना हरकत दाखला दिला जात होता. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अंतरिम दाखला दिला जात होता. ही दाखला देण्याची पद्धत वेळखाऊ होती. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक, नागरिकांकडून ना हरकत दाखला देण्याची पद्धत सुकर करण्याची मागणी पालिकेकडे केली जात होती, असे हांगे यांनी सांगितले.बांधकाम करताना फायर एनओसी असणे आवश्यक असते. या विषयीची प्रचलित पद्धत बदलणे गरजेचे होते. कारण याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. तक्रारींचे स्वरूप हे विलंब होत असल्याच्या होत्या. त्यामुळे त्यात सुधारणा आणण्याचे धोरण राबविले. अग्निशामक कायद्यानुसार अग्निशामक अधिकाºयानेच ना हरकत दाखला देणे गरजेचे आहे. आॅनलाइन एनओसीमुळे नागरिकांचा त्रास आणि पालिकेतील चकरा कमी होणार आहेत. - अच्युत हांगे, अतिरिक्त आयुक्त

टॅग्स :Puneपुणे