शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत दरवाजाच्या कारखान्याला आग, लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 05:24 IST

प्लायवूडचा दरवाजा बनविणा-या कारखान्याला शुक्रवारी (दि. ९) दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. यात मशिन, प्लायवूड, तसेच इतर साहित्य खाक झाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही.

चिखली -येथील प्लायवूडचा दरवाजा बनविणाºया कारखान्याला शुक्रवारी (दि. ९) दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. यात मशिन, प्लायवूड, तसेच इतर साहित्य खाक झाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही. घटनास्थळी दाखल अग्निशामक दलाच्या जवानांना अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले; परंतु आगीचे कारण समजू शकले नाही.चिखली येथे देहू-आळंदी रस्त्यालगत वेदान्त हॉटेलच्या मागे असलेल्या शेडच्या ओळीतील सर्वांत शेवटी प्लायवूडचे दरवाजे व इतर साहित्य बनविणाºया कारखान्याला आग लागली. शुक्रवारी सुटी असल्यामुळे एकही कामगार कंपनीत हजर नव्हता. आगीत सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कारखान्याचे मालक प्यारुसाहेब शेख यांनी सांगितले.आग विझविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पिंपरीतील संत तुकारामनगर, तळवडे, प्राधिकरण, भोसरी येथील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अरुंद रस्ता असल्याने अग्निशामक बंब घटनास्थळी नेण्यासाठी जवानांना मोठी कसरत करावी लागली. बंब घटनास्थळी जाईपर्यंत कारखान्यातील सर्व लाकडी प्लाय, शीट, तसेच इतर सामानाने पेट घेतला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तरीही आगीच्या ज्वाळा उग्र रूप घेत होत्या.अग्निशामक दलाचे उपअधिकारी उदय वानखेडे, प्रताप चव्हाण, फायरमन शांताराम काटे, प्रदीप कांबळे, गोरखनाथ घाडगे, दिनेश इंगलकर, महेंद्र पाठक, अवतारे, सारंग मंगरूळकर, विवेक खांदेवाड, रुपेश जाधव, राजेंद्रकुमार गवळी, शिवलाल झणकर, वाहनचालक प्रदीप भिलारे, नारायण तापकीर यांनी आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. 

टॅग्स :fireआगnewsबातम्या