शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी इथं भंगाराच्या गोदामांना आग, १५० गोदामे, दुकाने खाक; मोठी जीवितहानी टळली

By नारायण बडगुजर | Updated: April 6, 2024 21:16 IST

कुदळवाडीतील घटना, अग्निशामक दलाच्या १२ गाड्या, पुणे महापालिकेची एक, चाकण नगर परिषदेची एक, चाकण एमआयडीसीची एक, चिंचवड एमआयडीसीची एक व टँकर घटनास्थळी दाखल झाल्या.

पिंपरी : भंगार साहित्याच्या गोदामांना लागेल्या आगीत सुमारे १५० गोदामे व दुकाने जळून खाक झाली. चिखलीतील कुदळवाडी परिसरात शनिवारी (दि. ६) रात्री पावणेएकच्या सुमारास ही घटना घडली. आग लागलेल्या परिसरातील नागरिकांना वेळीच बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. आगीचे कारण समजू शकले नाही.

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, चिखलीतील कुदळवाडी येथील अनधिकृत भंगार गोदामाला आग लागल्याची माहिती शनिवारी रात्री पावणेएकच्या सुमारास मिळाली. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब आणि जवान घटनास्थळी लागलीच दाखल झाले. गोदामांमध्ये प्लास्टिक, रबर, काच, कागद असे साहित्य असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या १२ गाड्या, पुणे महापालिकेची एक, चाकण नगर परिषदेची एक, चाकण एमआयडीसीची एक, चिंचवड एमआयडीसीची एक व टँकर घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामकच्या ८० जवानांनी ७० ते ७२ बंबांच्या साह्याने सकाळी सहापर्यंत आग नियंत्रणात आणली. सात ते आठ एकरचा परिसर आगीने बाधीत झाला. 

प्रशासनाला माहिती मिळेना

चिखली कुदळवाडीतील अनधिकृत भंगार गोदामांचा प्रश्न अनेक वर्षांपासून आहे. महापालिकेने वेळोवेळी संबंधित व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. व्यावसायिक नोटीसींना प्रतिसाद देत नाहीत. ना हरकत प्रमाणपत्र घेत नाहीत. योग्य त्या उपाययोजनांची पुर्तता करत नाहीत. आग नियंत्रणात आणण्याची त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा नाही. आगीच्या घटनेनंतर नुकसान झालेल्या गोदामांची व त्यांच्या मालकांची माहितीही दिली जात नसल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले. 

पोलिसांचा फौजफाटा

आगीचे लोट पाहून नागरिकांनी परिसरात एकच गर्दी केली होती. दीड ते दोन हजार नागरिक तेथे जमा झाले होते. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह इतर पोलिस ठाणे तसेच मुख्यालयाकडील फौजफाटा तैनात केला होता, तसेच पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

आगीत नुकसान झालेल्या गोदाम व दुकानांच्या मालकांची नावे व इतर माहिती कळू शकलेली नाही. उन्हाळ्यामुळे या भागात पुन्हा आग लागण्याचा धोका आहे. या गोदामांमुळे वारंवार आगीच्या घटना घडतात. व्यावसायिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.  - मनोज लोणकर, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका   

आगीचे कारण समजू शकलेले नाही. अग्निशामक दलाच्या अहवालानंतर याबाबत गुन्हा दाखल करावा किंवा कसे याबाबत कार्यवाही होईल. - ज्ञानेश्वर काटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली

टॅग्स :fireआग