पिंपरी : सात-आठ महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने ६ आॅगस्टला आलम अब्दुल कलाम अन्सारी (वय २४) याला मारहाण केली होती . तसेच डोक्यात बिअरची बाटली फोडून व चाकुने वार करून त्याचा खून केला होता. याप्रकरणी त्यामुळे पोलिसांनीखून प्रकरणी मोहमद जेनिफ अन्सारी (वय २०) व संतोष यादव नालासोपारा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा वासी येथे राहणाऱ्या अब्दुल कलाम सुभेदार अन्सारी यांनी त्यांचा मुलगा आलम दिघीतून बेपत्ता झाल्याची फिर्याद दिघी पोलिसांकडे दाखल केली होती. बेपत्ता झालेल्या आलम याचा मृतदेह दिघीतील जंगलात झाडीत आढळून आला आहे.
खून प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 18:46 IST