शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटल सेंटरमध्ये कोरोना योद्ध्यांची आर्थिक छळवणूक; मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 20:27 IST

रुग्णसेवा देणाऱ्या परिचारिकांना गेल्या दीड महिन्यांपासून वेतन दिले गेले नाही..

ठळक मुद्देशिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदन

पिंपरी : रेड कार्पेट टाकून पीएमआरडीएने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या नेहरूनगर येथील जम्बो कोविड हॉस्पीटलमध्ये परिचारिकांची आर्थिक छळवणूक होत असून त्याविरोधात मंगळवारी परिचारिकांनी आंदोलन केले.

कोरोनाचा आलेख वाढत असताना राज्य शासनाच्या वतीने पीएमआरडीच्या माध्यमातून नेहरूनगर येथे कोविड हॉस्पीटल सुरू केले होते. या ठिकाणी रुग्णसेवा देणाऱ्या परिचारिकांना गेल्या दीड महिन्यांपासून वेतन दिले गेले नाही. याबाबत परिचारिकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याची दखल घेऊन मनसेच्या वतीने मंगळवारी दुपारी आंदोलन केले. यावेळी मनसेचे गटनेते सचिन चिखले, पुण्यातील नगरसेविका रुपाली पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना योद्धांचा अपमान करणाऱ्या कोविड केअर हॉस्पिटल संचालकांची निषेध करण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

रुपाली पाटील म्हणाल्या, ‘‘जंम्बो हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या ३८ नर्सेसला दीड महिन्यांपासून वेतन दिले नाही. तसेच तीन महिन्यांचा करार असताना त्यांना कामावरुन काढून टाकले आहे. ही बाब चुकीची असून रुग्णालय चालकांकडून परिचारिकांना धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत आम्ही पालकमंत्री आणि पीएमआरडीए प्रशासनाची भेट घेऊन हॉस्पिटलमधील कारभाराविषयी तक्रार करणार आहोत. आघाडीच्या सरकारमध्ये भाजपावाल्यांचे टेंडर आहेत. हे कसे काय? ’’ 

मनसे गटनेते सचिन चिखल म्हणाले, ‘‘२२ ते  ३० हजार रुपये प्रतिमहिना परिचारिकांना द्यायचे कबूल केले असताना केवळ पाच हजार रुपये देऊन कामावरून कमी केले जात आहे. हा कोरोनायोद्धांचा अपमान आहे.  काल रात्री परिचारिकांना फुटपाथवर रहावं लागले. जेवण राहणं हवं. परिचारिकांना पूर्णपणे वेतन द्यायला हवे.’’ ...... वेतन द्यायलाच हवे.. परिचारिकांची तक्रार आल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी दखल घेऊन रुग्णालय संचालकास झापले. ढोरे म्हणाल्या, ‘‘कोरोनाच्या काळात योद्धा म्हणून काम करणाऱ्या परिचारिकांना कामावरून काढून टाकणे चुकीचे आहे. ठेकेदाराने वेळेत वेतन दिले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कोणाचेही वेतन थकविता कामा नये.’’ ...... पीएमआरडीकडे तक्रार करणार.. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ‘‘जम्बो कोवीड हॉस्पिटलची जबाबदारी पीएमआरडीएकडे आहे. परिचारिकांना काम करून वेतन दिले जात नसेल तर चुकीची बाब आहे. याबाबत पीएमआरडीए प्रशासनाशी बोलणार आहे. कामगारांचे वेतन द्यायलाच हवे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMNSमनसेagitationआंदोलनhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या