अखेर त्यांनी भूमिका घेतली! पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत

By विश्वास मोरे | Published: July 5, 2023 11:30 AM2023-07-05T11:30:49+5:302023-07-05T11:31:22+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह सर्व पदाधिकारी सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत....

Finally he took a stand city NCP with Ajit Pawar in Pimpri Chinchwad | अखेर त्यांनी भूमिका घेतली! पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत

अखेर त्यांनी भूमिका घेतली! पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत

googlenewsNext

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकार बरोबर जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी तसेच नगरसेवक, माजी नगरसेवक कोणाबरोबर अशी चर्चा रंगली होती. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली आहे विद्यमान नगरसेवक तसेच संघटनेचे पदाधिकारी यांनी अजितदादा बरोबर जाण्याची भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह सर्व पदाधिकारी सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये उभी फूट पडली. महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला असून राष्ट्रवादीमध्ये फूट पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादीत सर्वाधिक समर्थक कुणाचे याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे.

मुंबईत अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही या गटांची स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे. दरम्यान  राष्ट्रवादीने अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

कोण कोणाबरोबर आज होणार फैसला?

मुंबईत होणाऱ्या बैठकीला जास्तीत जास्त आमदार, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे म्हणून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर अजित पवार गटाने वांद्रे येथील भुजबळ यांच्या संस्थेच्या सभागृहात बैठक आयोजित केली आहे.

पिंपरी चिंचवडमधून अजित पवार यांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्ष नेते श्याम लांडे, राहुल भोसले, माजी नगरसेवक संजय वाबळे, मोरेश्वर भोंडवे, समीर मासुळकर, राष्ट्रवादी युवकचे विशाल वाकडकर, यश साने, प्रदिप तापकीर, श्याम जगताप, फजल शेख, इकलास सय्यद, सुशील मंचरकर, अक्षय माछरे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, आदी पदाधिकारी रवाना झाले.

Web Title: Finally he took a stand city NCP with Ajit Pawar in Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.