पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित तक्रारी करण्यासाठी विविध माध्यमांतून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक तक्रारी सारथी हेल्पलाइनद्वारे येत असून त्या खालोखाल वेबपोर्टलच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण आहे. लोकशाही दिनाच्या माध्यमातून येणाºया तक्रारींचे प्रमाण अत्यल्प आहे. यावरून आॅनलाइन तक्रारीवरच अधिक भर असल्याचे दिसून येत आहे.नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून लोकशाही दिनासह विविध माध्यमातून तक्रार देण्याची व्यवस्था आहे. लोकशाही दिन, वेबपोर्टल, सारथी हेल्पलाइन, एसएमएस, ई-मेल, मोबाइल अॅप आदींची सुविधा उपलब्ध आहे. शहरातील नागरिक पाणी, रस्ते, ड्रेनेज आदी विषयांबाबत तक्रार करू शकतो. यामध्ये लोकशाही दिनाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. सहा महिन्यांत केवळ एकच तक्रार प्राप्त झाली आहे. तर वेबपोर्टल, सारथी हेल्पलाइन, एसएमएस, ई-मेल, मोबाइल अॅप अशा आॅनलाइन सुविधेद्वारे घरबसल्या तक्रार नोंदविणाºयांचे प्रमाण अधिक आहे. दि. १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत सारथी हेल्पलाइनवर ११ हजार ७२८ तक्रारी आल्या, तर वेबपोर्टलद्वारे दोन हजार १८१ तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त झालेल्या तक्रारी तातडीने संबंधित विभागाला पाठवून त्याचा निपटारा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.घरबसल्या तक्रारमहिन्यातून एकदा आयोजित केल्या जाणाºया लोकशाही दिनासाठी पंधरा दिवस अगोदर अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर प्रत्यक्ष हजर राहावे लागते. यापेक्षा सारथी हेल्पलाइन, एसएमएस, वेबपोर्टल, ई-मेल यावर नागरिक तक्रारी करू लागले आहेत. आॅनलाइन तक्रारीवरच अधिक भर असल्याचे दिसून येत आहे. घरबसल्या तक्रारी करणे शक्य होत असल्याने लोकशाही दिनास अल्प प्रतिसाद मिळत असल्याचेही बोलले जात आहे.प्रत्यक्ष हजर राहणे होत नाही शक्यअनेकांना महापालिका अथवा क्षेत्रीय कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन तक्रार करणे शक्य होत नाही. यामध्ये वेळही अधिक जातो. त्यामुळे आॅनलाइनचा मार्ग निवडला जातो. यामध्ये सारथी हेल्पलाइन, वेबपोर्टल, मोबाइल या माध्यमातून तक्रार देऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जातो.
आॅनलाइन तक्रारींवर भर; तक्रार निवारणाकडे होतेय दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:58 IST