पिंपरी : पंधरा वर्षीय मुलावर अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना नेहरुनगर येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलाने पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली आहे. अल्पवयीन मुलावर अत्याचार होण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.२७ सप्टेंबरला मुलगा नेहरुनगर येथील संतोषी माता चौकात बसला असताना आरोपी दुचाकीवरून तेथे आला. पीडित मुलाचे वडील टेम्पोचालक आहेत. आरोपीने टेम्पो भाड्याने पाहिजे, तुझ्या वडिलांकडे चल असे सांगून त्यास दुचाकीवर बसविले. भोसरी रस्त्यावरील गुलाब पुष्प उद्यानाजवळ नेले. अनैसर्गिक कृत्य केले. जिवे मारून टाकण्याची धमकी दिली.मुलाने आरोपीचे वर्णन सांगितले असून, त्यानुसार आरोपीसावळ्या रंगाचा, दाढी असलेला व अंदाजे २० ते २५ वयोगटातील असल्याचे सांगितले आहे.
पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 03:27 IST