शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सराईताकडून पंधरा गुन्हे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:24 IST

पिंपरी पोलिसांनी अटक केलेल्या तीन सराईत आरोपींकडून तब्बल ७ लाख ५३ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे पिंपरी, निगडी, लोणी काळभोर, कुर्डुवाडी, भोसरी, हिंजवडी या पोलीस ठाण्यातील एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

पिंपरी - पिंपरी पोलिसांनी अटक केलेल्या तीन सराईत आरोपींकडून तब्बल ७ लाख ५३ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे पिंपरी, निगडी, लोणी काळभोर, कुर्डुवाडी, भोसरी, हिंजवडी या पोलीस ठाण्यातील एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.नीलेश मनोहर गायकवाड (वय २८, रा. विद्यानगर बस स्टॉपच्या मागे, चिंचवड), शंकर मधुकर पवार (वय १९, रा. निराधारनगर झोपडपट्टी, पिंपरी. मूळ रा. पिनोर, ता. मोहोळ), समीर मुख्तार शेख (वय २४, रा. आंबेडकर कॉलनी, सरकारी दवाखान्याजवळ, उरुळी कांचन, ता. हवेली) आणि विकास दिलीप कांबळे (वय २६, रा. पत्राशेड, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.सहायक आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई रोहित पिंजरकर यांना नीलेश गायकवाड परशुराम चौक,विद्यानगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडेचौकशी केली असता सात मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून सात दुचाकी जप्त केल्या. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील सहा आणि निगडी ठाण्यातील एक असे सात वाहनचोरीचे गुन्हे उघड झाले.पोलीस हवालदार राजेंद्र भोसले यांना माहिती मिळाली की, शंकर आणि समीर हे दोघे पिंपरीतील साई चौकाजवळील भुयारी मार्गातयेणार आहेत. त्यानुसार तपास पथकातील पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण आठ मोटारसायकल, एक एलईडी टीव्ही, एक डीव्हीडी असा ४ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील चार, लोणी काळभोर, कुर्डुवाडी, भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण आठ गुन्हे उघड झाले आहेत.पोलीस शिपाई उमेश वानखडे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास भटनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विकास आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे. एक लोखंडी कोयता आणि दुचाकी असा एकूण ७६ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक विठ्ठल बढे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या