पंधरा मिनिटांत ९८ विषय मंजूर

By Admin | Updated: October 15, 2016 02:48 IST2016-10-15T02:48:10+5:302016-10-15T02:48:10+5:30

आचार संहितेपूर्वीच्या शेवटच्या तळेगाव दाभाडे नगर परिषद सर्वसाधारण सभेत ९८ विषय पंधरा मिनिटांत मंजूर करण्यात आले.

In fifteen minutes 98 subjects are approved | पंधरा मिनिटांत ९८ विषय मंजूर

पंधरा मिनिटांत ९८ विषय मंजूर

चिखली, दि. १४- जिल्हाभरात शाळा प्रगत करण्याचे विविध उपक्रम राबविण्यात येत असून याबाबत कार्य वेगाने सुरू आहे. शिवाय मराठी शाळांसोबतच उर्दू माध्यमाच्या शाळासुद्धा प्रगत झाल्या पाहिजेत, यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी उर्दू माध्यमाच्या सर्वच शाळा प्रगत करण्याचे ध्येय शिक्षकांसमोर ठेवत असून त्यास शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा जि.प. मुकाअ दीपा मुधोळ यांनी व्यक्त केली.
स्थानिक ङ्म्री शिवाजी हायस्कूलमध्ये १४ ऑक्टोबर रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेद्वारे आयोजित जिल्हास्तरीय उर्दू शिक्षक कार्यशाळेला संबोधित करताना त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्यांनी या कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांबाबत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. तर जि.प. उपाध्यक्ष पांडुरंग पाटील खेडेकर यांनी विद्यार्थी घडला पाहिजे ही सर्वांंंंंची अपेक्षा आहे आणि हे पवित्र कार्य शिक्षकांना करावे लागणार असल्याने शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडताना प्रगत विद्यार्थी घडविण्याचा चंग बांधावा व आपल्या शाळा प्रगत करण्यासह अभियानातही आपला जिल्हा राज्यात प्रगत करण्याच्या उद्देशाने जोमाने कामास लागावे, असे आवाहन केले.
प्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य समाधान डुकरे, शिक्षणाधिकारी प्राथ.एन.के. देशमुख, प्राचार्य पी. एस. वायाळ, राजेश गवई, शिवशंकर मोरे, गटशिक्षणाधिकारी एस.सी. राजपूत, विस्तार अधिकारी काळे यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेला जिल्हाभरातील ७00 उर्दू माध्यमाचे शिक्षक उपस्थिती होती.

Web Title: In fifteen minutes 98 subjects are approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.