शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शिरगावमध्ये बस स्थानकात सापडले स्त्री जातीचे अर्भक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 19:02 IST

शिरगाव येथील बस स्थानकावर स्त्री जातीचे अर्भक सापडले.

तळेगाव दाभाडे : शिरगाव येथील बस स्थानकावर स्त्री जातीचे अर्भक सापडले हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.१०) रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आला.  संतोष गोपाळे ( रा. शिरगाव ता. मावळ यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हे  शिरगावात मारुती मंदिराजवळ राहतात. त्यांच्या घरापासून काही अंतरावर शेड बस स्थानक आहे.ते रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले असताना बस स्टॉप जवळ त्यांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. बस स्टॉपमध्ये जाऊन बघितले असता फरशीवर साचलेल्या पाण्यात पातळ कापडात गुंडाळलले स्त्री जातीचे 25 ते 30 दिवसांचे बाळ दिसले. त्यांनी तात्काळ शिरगावचे पोलीस पाटील आणि उपसरपंच यांना याबाबत माहिती दिली. बाळ पाण्यात असल्याने ते थंडीने काकडून गेले होते.  संतोष यांनी आपल्या घरून मुलीचे सापडलेल्या बाळाला घातले. तसेच उपसरपंचांनी बाळाच्या दुधाची व्यवस्था केली. त्यानंतर सर्वांनी मिळून तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गाठले.  पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवून घेतला.  बाळाची वैद्यकीय तपासणी पुणे येथील ससून रुग्णालयात करण्यात असून तेथील अनाथ तिला बालकाश्रमात दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसCrime Newsगुन्हेगारी