शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मांसाहारी जेवणावरून आईशी वाद घालणाऱ्या वडिलांचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 16:00 IST

कोरोना व्हायरस बाबतच्या मेसेज मुळे वाद?

ठळक मुद्देदेहू येथील घटना : देहूरोड पोलिसांनी केली मुलाला अटक

पिंपरी : मांसाहारी जेवण तयार करून देण्यासाठी नकार दिल्याने आई व दारु पिऊन आलेले वडील यांच्यात वाद झाला. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुलाला वडिलांनी मारहाण केली. यात मुलाने लाकडी दांडक्याने डोक्यात मारल्याने वडिलांचा मूत्यू झाला. देहू येथील विठ्ठलवाडी येथे रविवारी (दि. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. दारू पिऊन आईला त्रास देणाऱ्या वडिलांना मुलाने लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने वडिलांचा मृत्यू झाला. देहूगाव येथील विठ्ठलवाडी येथे रविवारी (दि. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. संतोष विठ्ठल येळवंडे (वय ४७) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. विराज संतोष येळवंडे (वय १९) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. तर त्याची आई कविता संतोष येळवंडे (वय ४०, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष येळवंडे त्यांची पत्नी फिर्यादी कविता यांना दारू पिऊन त्रास देत असत. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते अशाच पद्धतीने दारू पिऊन आले. मांसाहारी जेवण तयार करून दे, असा आग्रह त्यांनी पत्नी कविता यांच्याकडे धरला. रोगराई पसत आहे, कशाला अशा मांसाहार घेता व आम्हालाही मांसाहार करायला सांगतात, असे फिर्यादी कविता पती संतोष यांना म्हणाल्या. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. यात संतोष यांनी पत्नी कविता यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा मुलगा विराज याने त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतोष यांनी मुलगा विराज यालाही शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या वादात मुलगा विराज याने लाकडी दांडक्याने वडील संतोष यांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले. याबाबत शेजारील काही जणांना माहिती मिळाली. संतोष यांना पिंपरी येथील वायीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलगा विराज याला पोलिसांनी अटक केली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शाहीद पठाण तपास करीत आहेत.

कोरोना व्हायरस बाबतच्या मेसेज मुळे वाद?चीनमध्ये कोरोना व्हायरसने हजारो जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाबाबत अनेक समज व गैरसमज आहेत. मांसाहरातून हा व्हायरस होत असल्याचा मेसेज तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. खातरजमा न करताच असे मेसेज फॉरवर्ड करण्यात येत आहेत. त्यामुळे मांसाहार धोकादायक असल्याचा बहुतांश जणांचा गैरसमज आहे. असाच समज झाल्याने कविता यांनी मांसाहारी जेवण तयार करण्यास नकार दिला. त्यामुळे पती संतोष येळवंडे यांनी कविता यांच्याशी वाद घातल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMurderखूनPoliceपोलिसcorona virusकोरोना