शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत पिंपरीत रविवारी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 14:39 IST

पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत येत्या रविवारी लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सकाळी साडेदहा वाजता उपोषणाला होणार सुरुवात ‘पीसीसीएफ’च्या मिस्ड कॉल मोहिमेस शहरातून प्रचंड प्रतिसाद

पिंपरी : पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत येत्या रविवारी लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणात विविध संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन, पीसीसीएफने केले आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी सकाळी साडेदहा वाजता लाक्षणिक उपोषणाला सुरुवात होणार आहे. हे उपोषण सायंकाळी पाचपर्यंत असणार आहे. यामध्ये ग्राहक पंचायत पिंपरी-चिंचवड, संस्कार प्रतिष्ठान पुणे, आस्था सोशल फाऊंडेशन, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, भावसार व्हिजन, पिंपरी-चिंचवड, प्रदीप वाल्हेकर आणि टीम, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, पोलीस नागरिक मित्र महाराष्ट्र राज्य, एसबीआय पेन्शनर असोसिएशन, माउली ज्येष्ठ नागरिक संघ -आकुर्डी, फेडरेशन आॅफ घरकुल आणि जलदिंडी प्रतिष्ठान या संघटना सहभागी होतील. केंद्र सरकारने यासाठी तत्त्वत: मंजुरी दिली असली, तरी देखील इतर सर्व स्तरांवरून या मागणीबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पीसीसीएफ’च्या मिस्ड कॉल मोहिमेस शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या लाक्षणिक उपोषणात पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली नाहीपिंपरी-चिचंवड सिटीझन फोरमच्या सदस्यांनी पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पालकमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने निधी देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असूनही या कामाच्या मंजुरीसाठी अडथळे निर्माण केले जात आहेत.

टॅग्स :Metroमेट्रोpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnigdiनिगडी