शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडून रस्त्यासाठी शेतजमिनीचे दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 02:05 IST

नागरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वत्र जमिनीला सोन्याचा भाव आला आहे.

- देवराम भेगडे देहूरोड : नागरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वत्र जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. जमिनीवरून सख्खे भाऊ आणि बहिणी, भावकी व शेजारी यांचे वाद होत आहेत. विविध सरकारी प्रकल्प, रस्ते, नागरी भागातील विकास आराखड्यातील सुविधा विकसित करण्यासाठी मोबदला मिळणार असतानाही जमीन मालक व शेतकरी त्याकरिता जमीन देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महत्त्वाचे विकास प्रकल्प, रिंगरोड, आरक्षणे विकसनाची कामे होऊ शकलेली नाहीत. मात्र देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील किन्हई गावातील शेतकºयांनी कसलाही मोबादला न घेता अडीच किलोमीटर लांबीचा किन्हई ते शेलारवाडी दरम्यानचा सार्वजनिक रस्ता उभारण्यासाठी मोफत जमीन दाने केली आहे.शेतकºयांनी जमीन उपलब्ध करून दिल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्या अ‍ॅड. अरुणा पिंजण यांच्या प्रयत्नातून कॅन्टोन्मेंटकडून यंत्रसामग्रीचे सहकार्य घेऊन १५ दिवसांत मुरूमाचा कायमस्वरूपी पक्का रस्ता तयार केला आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील किन्हई गावातील बहुतांशी शेतजमिनी विविध लष्करी प्रकल्पांसाठी सुरुवातीला ब्रिटिश सरकार व देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने संपादित केलेल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. त्यातच देहूरोड व इतर भागात ये-जा करण्यासाठी लष्करी भागातील त्यांच्या ताब्यातील एकाच रस्त्यावर अवलंबून राहावे लागत होते. शेलारवाडी, तळेगाव दाभाडे व मावळ भागात जाण्यासाठी नऊ- दहा किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. किन्हई तेशेलारवाडी रस्ता करण्याचीअनेकदा मागणी होत होती. २०१९ वर्षाच्या सुरुवातीच्या मुहूर्तावर काम सुरू झाले आहे.>शेतातील पिके काढून दिली जमीनअ‍ॅड. अरुणा पिंजण यांनी किन्हई -शेलारवाडी रस्ता करण्यासाठी गावातील ग्रामस्थ व शेतकरी यांची बैठक घेतली. संबंधित रस्ता तयार करण्यासाठी सरकारी पातळीवर नवीन रस्त्याची मागणी, सर्वेक्षण, भूसंपादन, संभाव्य अडचणी, जमीन मोबदला, नुकसान भरपाई, अंदाजपत्रक मंजुरी, रस्ता बांधकाम मंजुरी आदी सर्व सोपस्कार पूर्ण झाले तरच रस्त्याचे काम होऊ शकते. मात्र याकरिता मोठा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसेच शेतकºयांनी मोबदला न घेता रस्त्यासाठी जमीन उपलब्ध करून दिल्यास रस्ता तयार करणे शक्य असल्याचे या बैठकीत पिंजण यांनी सांगितले. पिंजण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत किन्हईतील २२ शेतकºयांनी पिके काढून घेत रस्त्यासाठी जमीन दिली.१५ दिवसांत अडीच किलोमीटर रस्ताकॅन्टोन्मेंट बोर्डाने रस्त्याच्या कामासाठी लागणारी दोन यंत्रे व दोन डंफर अशी यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. एका शेतकºयाने त्याच्या जमिनीतील मुरूम उपलब्ध करून दिला असून, अवघ्या १५ दिवसांत अडीच किलोमीटर लांब व १५ फूट रूंदीचा पक्का रस्ता सुमारे पाच लाख रुपये खर्चात तयार झाला असून, मावळचे आमदार बाळा भेगडे, सर्व बोर्ड सदस्य, उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाहतुकीसाठी समारंभपूर्वक खुला करण्यात आला आहे.>किन्हईतील शेतकºयांनी यापूर्वी संरक्षण विभागाच्या प्रकल्पां-साठी जमिनी दिलेल्या आहेत. असे असतानाही रस्त्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर पुन्हा रस्त्यासाठी मोफत जमीन देण्यास एकाच बैठकीत संमती दिली. रस्त्यासाठी सहकार्य करून वेगळा आदर्श या शेतकºयांनी ठेवला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन व पदाधिकाºयांनी सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केल्याने रस्ता तयार झाला आहे.- अ‍ॅड. अरुणा पिंजण, सदस्या, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड