शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत बांधकामे नियमितीकरणास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 17:14 IST

बांधकामे नियमितीकरणास राज्याच्या नगर विकास विभागाने मुदतवाढ दिली आहे. १८ फेब्रुवारी २०१९ ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत असणार आहे.

ठळक मुद्देजाचक अटी-शतीमुर्ळे बांधकामे नियमितीकरण प्रक्रियेला नागरिकांचा अल्प प्रतिसादअवैध बांधकामे नियमितीकरणासाठीची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध

पिंपरी : अवैध बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय राज्य सरकारने गेल्यावर्षी घेतला. त्यानुसार सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, या कालखंडात केवळ २४ अर्ज आल्याने नियमितीकरणास राज्याच्या नगर विकास विभागाने मुदतवाढ दिली आहे. १८ फेब्रुवारी २०१९ ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत असणार आहे. बांधकामे नियमित करण्यासासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. राज्यभरातील डिसेंबर २०१५ पूर्वीची अवैध बांधकामे अधिकृत करण्याची अधिसूचना राज्य सरकारने जाहीर केली होती. त्यानुसार प्रारूप नियमावली गेल्यावर्षी ७ आॅक्टोबरला जाहीर केली. त्यास महाराष्ट्र टाऊन प्लॅनिंग (एकत्रित संरचना) नियम २०१७ असे म्हटले होते. त्यात कोणती अवैध बांधकामे अधिकृत करायची व कोणती नाहीत, याबाबतचे स्पष्ट निकष प्रसिद्ध केले होते. त्यानुसार डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अवैध बांधकामांनाच अधिकृत करणे, नद्या, कालवे, पूररेषा, रेडझोन, ऐतिहासिक क्षेत्र, कचरा डेपो, डोंगराळ उतार भागातील आणि धोकादायक अवैध बांधकामे अधिकृत करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर हरकती व सूचना मागविल्या व एक महिन्यात नागरिकांनी केलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून सरकारने अवैध बांधकामे अधिकृत करण्याची अधिसूचना जारी केली. त्यामुळे अवैध बांधकामे अधिकृत करण्याचा कायदा झाला. अधिसूचनाही प्रसिद्ध झाली. त्यानुसार महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१७ पासून अवैध बांधकामे नियमितकरण प्रक्रिया राबविली. ......................कक्ष करूनही प्रतिसाद नाहीच महापालिका मुख्यालयात स्वतंत्र कक्ष सुरु केला. नियमावलीतील जाचक अटी-शतीमुर्ळे बांधकामे नियमितीकरण प्रक्रियेला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. पहिल्या सहा महिन्यात केवळ चोविस जणांनी अर्ज केले होते. मुदत संपल्याने अर्ज स्वीकारण्यास बंद केले होते.  नगर विकास विभागाने अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ १८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत असणार आहे.  आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले,बांधकामे नियमितीकरणासाठी महापालिकेने कक्ष स्थापन केला आहे. अवैध बांधकामे नियमितीकरणासाठीची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध आहे. नियमितीकरणासाठी त्यासाठी सविस्तर अर्जाचे नमुने, आवश्यक कागदपत्रे, वारंवार विचारले जाणारे प्रश्न, सरकारी निर्णय याबाबतची सविस्तर माहिती या वेबसाईटवर अवैध बांधकामे नियमितीकरण या लिंकवर उपलब्ध आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासासाठी अर्ज सादर करावेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड