शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

संरक्षण खात्यातील प्रश्नांबाबत नितीन गडकरींना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 16:41 IST

शहरातील वाढती लोकसंख्या व वाहतुकीचा विचार करता रस्ते विकसित करणे आवश्यक

ठळक मुद्देमहिन्याअखेरीस सरंक्षण विभागासमवेत बैठक होणारमिळकतीमधून जाणारे रस्त्याच्या जागांच्या प्रश्नाबाबत चर्चा रस्त्यांसाठी आवश्यक असणाऱ्या जागेची रक्कम संरक्षण विभागास द्यावी लागेल...

पिंपरी : शहरातील लष्करी हद्दीतील विविध प्रश्नांबाबत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. केंद्र सरकारने सरंक्षण विभागाकडील जागा रस्त्यांसाठी महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही मागणी करण्यात आली आहे. दहा प्रकल्पांसाठी साकडे घातले आहे. महिन्याअखेरीस सरंक्षण विभागासमवेत बैठक होणार आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मौजे पिंपळे निलख , पिंपळे सौदागर, सांगवी, पिंपळे गुरव , दिघी, बोपखेल या गावाच्या आजू-बाजूला सरंक्षण विभागाच्या मिळकती आहेत. महापालिकेच्या मंजुर विकास योजनेत सरंक्षण विभागाच्या हद्दीतून रस्ते दाखविण्यात आलेले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या व वाहतुकीचा विचार करता रस्ते विकसित करणे आवश्यक आहे. सदरचे रस्त्यासाठी आवश्यक असणारी जागा संरक्षण विभागाने महापालिकेकडे हस्तातंरीत करण्यासाठी महानगरपालिकेने मागणी केलेली आहे. पुण्यात पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माधवी राजापुरे, माजी नगरसेवक राजु दुर्गे उपस्थित होत्या. कासारवाडी लांडेवाडी भोसरी येथील उच्चक्षमता द्रुतगती मार्गातील सी.एम.ई. कॉलेज हद्दीतील जागा, पिंपळे सौदागर सर्व्हे नं. २८ व २९  मधील जाणारा उच्चक्षमता द्रुतगती मार्ग,  मौजे पिंपळे सौदागर येथील सर्व्हे नं.७९ ते ११९ मधील १८ मी रुंद रस्ता, पिंपळे निलख येथील सर्व्हे नं. ९ मधील १२ मीटर रुंद रस्ता, सांगवी फाटा ते सांगवी गाव १२ मीटर रस्ता, बोपखेल येथील आळंदी रोड ते गणेशनगर सर्व्हे नं. ३१व १२७ मधील रस्ता, सांगवी येथील १२ मीटर रस्ता, पिंपरी येथील मिलिट्री डेअरी फार्म जवळ रेल्वे उड्डाणपूलासाठीची जागा, पिंपळे गुरव ते मौजे सांगवी पर्यंत संरक्षण विभागाच्या हद्दीतील  रस्त्यालगत १८ मीटर रुंद रस्ता, भोसरी कासारवाडी येथील सर्व्हे नं. ५१८, ५१९, ५२० या मिळकतीमधून जाणारे रस्त्याच्या जागांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली.                              विलास मडिगेरी म्हणाले, संरक्षण विभागाकडील जागा महापालिकेकडे हस्तांतरणासाठी बैठक घ्यावी, अशी विनंती केली आहे. त्यानुसार संरक्षण विभागाच्या मागणीनुसार रस्त्यांसाठी आवश्यक असणाऱ्या जागेची रक्कम संरक्षण  विभागास द्यावी लागेल. तसेच संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणारे रस्ते विकसित करण्यासाठी जे बांधकाम पाडले जाईल ते बांधकाम महापालिकेने बांधून द्यावे लागेल, असे गडकरी यांनी सांगितले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNitin Gadkariनितीन गडकरीIndian Armyभारतीय जवानroad transportरस्ते वाहतूक