शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

एक्साइजच्या पथकाचा गोव्यात छापा, देशी दारुच्या २१ लाखांच्या ६० हजार बाटल्या जप्त

By नारायण बडगुजर | Updated: January 30, 2024 20:12 IST

देशी दारुच्या २१ लाखांच्या ६० हजार बाटल्या जप्त

पिंपरी : गोवा राज्यात जाऊन बनावट देशी दारूच्या कारखान्याचा राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज) विभागाने पर्दाफाश केला. यात देशी दारुच्या २१ लाखांच्या ६० हजार बाटल्या आणि १५ लाखांचा टेम्पो यासह ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पुणे एक्साइजच्या ‘फ’ (पिंपरी) विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली. झुल्फिकार ताज आली चौधरी (६८, रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश), अमित ठाकूर आहेर (३०, रा. बोरमाळ, पारसवाडा, पो. कोचाई, ता. तलासरी, जि. पालघर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यासह इतर दोघांवर देखील एक्साइजने गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे. 

पुणे एक्साइजचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना मुंबई - पुणे महामार्गावर मामुर्डी परिसरात अवैध मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक्साइजच्या ‘फ’ (पिंपरी) विभागातर्फे सापळा लावला. त्यावेळी संशयित ट्रकची पाहणी केली असता गोवा राज्यात तयार झालेल्या बनावट देशी दारूच्या मद्याची ट्रकमधून अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचे समोर आले. ट्रकमध्ये रॉकेट संत्रा ९० मि.ली. क्षमतेच्या ६० हजार बाटल्या (६०० खोके) मिळून आल्या. यात बनावट देशी मद्याचा २१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ट्रकमध्ये मिळला. यामध्ये १५ लाखांच्या वाहनासह ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी २३ जानेवारीला गुन्हा दाखल केला. 

जप्त बनावट देशी मद्य हे गोव्यातील वडावल येथे पत्र्याच्या गोडावूनमध्ये तयार केले जात असून त्याची विक्री महाराष्ट्रात होत असल्याचे समजले. त्यानुसार एक्साइजच्या पथकाने गोव्यात कारवाई केली. गोवा पोलिसांची मदत घेऊन उत्तर गोवा जिल्ह्यातील डिचोळी तालुक्यातील वडावल येथील बनावट देशीमद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा घातला. यात बनावट देशी मद्यासाठीचा एक लाख ३४ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल सीलबंद केला. या कारवाईत एकूण ३८ लाख १४ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. झुल्फिकार याला गुन्ह्याच्या ठिकाणी व अमित याला गोव्यात जाऊन तपासादरम्यान अटक केली.   

एक्साइजचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक्साइजचे निरीक्षक दीपक सुपे, सासवडचे निरीक्षक प्रवीण शेलार, रोहित माने, आर. एम. सुपेकर, डी. वाय. गोलेकर, शीतल पवार, नम्रता वाघ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :raidधाडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड