शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रिक्षाचालक ते पिंपरी चिंचवडचे मेयर; राहुल जाधवांचा टॉप गियर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 08:37 IST

राहुल जाधव यांचा संघर्षपूर्ण 'प्रवास'

पिंपरी चिंचवड: कधीकाळी ज्या शहरात रिक्षा चालवली, काही वर्षांनी त्याच शहराचा महापौर होण्याचा मान राहुल जाधव यांनी मिळवला आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कथा पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव शब्दश: जगले आहेत. नुकत्याच झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवत महापौरपद मिळवलं. मात्र राहुल जाधव यांचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय अवघड होता. शहराचे प्रथम नागरिक झालेल्या राहुल यांचा प्रवास आव्हानात्मक आणि खडतर होता. चिखली गावातील जाधववाडीमध्ये 36 वर्षांपूर्वी एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांना लहानपणापासूनच संकटांचा सामना करावा लागला. जाधव यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर आर्थिक कारणांमुळे त्यांना शिक्षण सोडावं लागलं. शिक्षण अर्धवट सोडल्यावर कुटुंबाचा आर्थिक भार वाहण्यासाठी त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. 1996 ते 2003 या काळात जाधव यांनी रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकला. 2006 हे वर्ष जाधव यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. 2006 पासून त्यांनी भाजपाचे नगरसेवक असलेल्या माऊली जाधव यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. 2017 मध्ये राहुल यांचं नाव महापौरपदाच्या शर्यतीत होतं. मात्र त्यावेळी नितीन काळजे महापौर झाले. मात्र यंदा राहुल जाधव यशस्वी झाले आणि ज्या शहरात कधी काळी रिक्षा चालवली, त्याच शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान त्यांनी मिळवला.  

टॅग्स :Mayorमहापौरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा