शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंटच्या जंगलात शेतीतून पुरेसे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 01:37 IST

गेल्याकाही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगरांचाही झपाट्याने विकास झाला. त्याच वेगाने येथील शेती व्यवसाय संपुष्टात आला.

रहाटणी : गेल्याकाही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगरांचाही झपाट्याने विकास झाला. त्याच वेगाने येथील शेती व्यवसाय संपुष्टात आला. शेतीपेक्षा बांधकाम आणि इतर व्यवसायात अमाप पैसा मिळू लागल्याने अनेक शेतकरी इतर व्यवसायांकडे वळले आहेत. मात्र पिंपळे सौदागर येथील बाळासाहेब काटे वयाच्या ६६व्या वर्षीही जोमाने शेती करतात.बाळासाहेब काटे स्वत: शेतीकाम करतात. त्यामुळे कुठले पीक कधी घ्यावे याची त्यांना जाण आहे. त्यांनी सुमारे सात एकर जमिनीवर ज्वारी, हरभरा, वांगी, कांदा, मेथी, कोथिंबीर, लसूण, भेंडी, तर २५० कडीपत्त्याची व २५० लिंबाची झाडे लावली आहेत. या पिकातून त्यांना पुरेसे उत्पन्न मिळत आहे. परिसरातील नागरिक या शेतीला भेट देत आहेत. व्यापारी शेताच्या बांधावर माल खरेदी करतात. रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरवसह परिसरात १९९० पर्यंत शेती हाच मुख्य व्यवसाय होता. शेतीशिवाय पर्याय नव्हता. मात्र महापालिकेत समावेशानंतर समाविष्ट गावांतील या शेती व्यवसायाला हळूहळू उतरती कळा लागली. वाढत्या शहरीकरणामुळे बांधकाम व्यावसायिकांचा डोळा येथील शेतीवर फिरू लागला. अनेक शेतकऱ्यांनी पैशांच्या मोहापायी शेतजमिनी विकल्या. काहींनी जिल्ह्याच्या बाहेर जमिनी घेतल्या; मात्र ते पुन्हा शेतकरी झाले नाहीत. हळूहळू येथील शेतजमिनी कमी झाल्या. तेथे गगनचुंबी इमारती उभ्या आहेत. मात्र काही शेतकरी अद्यापही आपला पारंपरिक व्यवसाय म्हणून शेतीच करताना दिसून येत आहेत. त्यांपैकीच एक बाळासाहेब काटे आहेत.जमीन विकून इमारती उभ्या करण्यापेक्षा शेतीचा व्यवसाय आमच्यासाठी उत्तम असल्याचे काटे यांनी सांगितले. शेतमजूर मिळत नसल्याने ते आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती करीत आहेत. माणसाशिवाय पर्याय नाही तेथे ते स्वत: काम करतात. शेवगा, कडीपत्ता, लिंब यावर काटे यांनी भर दिला आहे. पालेभाज्या, गहू, बटाटा, ज्वारी यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. आधुनिक पद्धतीने शेती करीत असल्याने उत्पन्न त्याच पटीत मिळत असल्याचे काटे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती