शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मंकी हिलजवळ रेल्वे इंजिन रुळावरुन घसरले, पाचवी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 5:42 AM

पुणे-मुंबई लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंकी हिल हा परिसर रेल्वे अपघाताचे मुख्य ठिकाण बनले आहे. मंगळवारीदेखील पहाटे अडीचच्या सुमारास घाट उतरत असताना हूक तुटल्याने दोन रेल्वे इंजिन रुळावरून घसरले. यामुळे काही रुळ नादुरुस्त झाले आहेत. मिडल लाइनवर हा अपघात झाला.

लोणावळा : पुणे-मुंबई लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंकी हिल हा परिसर रेल्वे अपघाताचे मुख्य ठिकाण बनले आहे. मंगळवारीदेखील पहाटे अडीचच्या सुमारास घाट उतरत असताना हूक तुटल्याने दोन रेल्वे इंजिन रुळावरून घसरले. यामुळे काही रुळ नादुरुस्त झाले आहेत. मिडल लाइनवर हा अपघात झाला.घाट परिसरात रेल्वेचे अप, मिडल व डाऊन असे तीन मार्ग असल्याने या अपघाताचा वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नसला, तरी पुणे-भुसावळ एक्सप्रेस व पुणे-कर्जत पॅसेंजर या दोन गाड्या उशिराने धावल्या. रेल्वेचे बँकर्स (इंजिन ढकलायला वापरले जाणारे यंत्र) आणि पाच इंजिन मिडल लेनवरून कर्जत स्थानकाकडे जात होते. त्या वेळी पहिले तीन इंजिन व्यवस्थित गेले, मात्र चौथे व पाचवे इंजिन हूक तुटल्याने रुळावरून घसरले.पाचवी घटनाया अपघाताचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नसला, तरी मागील काही महिन्यांतील मंकी हिल भागात अपघाताची ही पाचवी घटना आहे. मिडल लाइन ही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली असून, रेल्वे रुळाचे काम झाल्यानंतर ती सुरु करण्यात येईल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी