शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

बाजारपेठेत चालणेही मुश्कील, हातगाड्या, पथारीवाले यांचे अतिक्रमण; वाहने रस्त्यावर उभी केल्याने अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 02:52 IST

दिवाळीनिमित्त बुधवारी व गुरुवारी देहूरोड बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर दुतर्फा उभ्या करण्यात आलेल्या मोटारी, रस्त्यावर खाद्यपदार्थ व इतर सामान विक्री करणा-या हातगाड्या, पथारीवाले यांच्या अतिक्रमणाने खरेदीसाठी आलेल्या पंचक्रोशीतील...

देहूरोड : दिवाळीनिमित्त बुधवारी व गुरुवारी देहूरोड बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर दुतर्फा उभ्या करण्यात आलेल्या मोटारी, रस्त्यावर खाद्यपदार्थ व इतर सामान विक्री करणा-या हातगाड्या, पथारीवाले यांच्या अतिक्रमणाने खरेदीसाठी आलेल्या पंचक्रोशीतील ग्राहकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चालणेही मुश्किल बनले होते. रस्त्यावर अतिक्रमण करणा-यांना व मोटार व दुचाकीचालकांना कोणतीही शिस्त लागलेली नसल्याचे चित्र दिसून आले आहे.देहूरोड कॅन्टोन्मेंट, देहूरोड बाजारपेठेतील विविध रस्त्यांवर अतिक्रमण करून दुकाने थाटल्याने वाहतुकीला व पादचाºयांना अडथळा होत असल्याने अनेकदा वाहतूककोंडी होत असल्याने खरेदीसाठी आलेले ग्राहक हैराण झाले होते. मुख्य रस्त्यावर हातगाड्या, छोटे व्यावसायिक, तसेच छोटे व्यापारी पथारी मांडून व्यवसाय करीत असल्याने, तसेच काही व्यापाºयांनी पदपथावर अतिक्रमणे केली असल्याने खरेदीसाठी येणाºया ग्राहकांना चालता येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.कॅन्टोन्मेन्ट बोर्ड प्रशासन व पोलीस यंत्रणेने कारवाई केल्याशिवाय बाजारपेठेत शिस्त लागणे अशक्य असल्याचे मत काही शिस्तप्रिय व्यापाºयांनी व्यक्त केले. बेशिस्तपणाला कंटाळून, पार्किंग व्यवस्था नसल्याने पंचक्रोशीतील ग्राहक खरेदीसाठी इतरत्र जाऊ लागल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याचे अनेक व्यापा-यांनी सांगितले.देहूरोड बाजारपेठेत खरेदीला उधाणदेहूरोड : लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा व भाऊबीजेसाठी देहूरोड येथील बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत मोठी उलाढाल होत आहे.लक्ष्मीपूजनासाठी लागणाºया रांगोळीपासून पूजासाहित्य, कपडे, आकर्षक वस्तू व गृह सजावटीपर्यंतच्या विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.लक्ष्मीपूजनासाठी बाजारात लक्ष्मीच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. ३० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत लक्ष्मीची मूर्ती बाजारात उपलब्ध होत्या. याशिवाय प्रसादासाठी लाह्या, बत्ताशे, चिरंजी व पूजेसाठी लागणाºया साहित्याची खरेदी बुधवारी व गुरुवारी दिवसभर सुरू होती.दिवाळीचे निमित्त साधून बाजारपेठेतील सर्व प्रमुख दुकानांत सध्या वेगवेगळ्या फॅशन्सच्या कपड्यांची, दागिन्यांची रेलचेल आहे. रेडिमेड कपडे, फटाके, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची लोकांनी खरेदी करीत असल्याचे चित्र दिसत होते. सोन्या-चांदीचे दागिने, दिवाळीसाठी आकाशकंदील, फटाके, फराळाचे तयार पदार्थ खरेदीसाठी सर्वत्र गर्दी दिसून आली. शोभेच्या वस्तू, आकाशकंदील, पणत्या, तोरणे, रांगोळी, रांगोळीचे रंग, सुगंधी द्रव्य, अत्तरे, भेट द्यायच्या विविध वस्तू, लहान मुलांचे कपडे, आयुर्वेदिक औषधे, महिलांसाठीची सौंदर्य प्रसाधने, दिवाळी फराळ यासह अनेक वस्तूंची खरेदी केली जात आहेत.प्रकाशाच्या सणात रस्ते अंधारातदेहूरोड : दिवाळी सणाला सोमवारी वसुबारसने सुरुवात झाली असताना लाखो दिव्यांनी देहूरोड बाजारपेठ व कॅन्टोन्मेन्ट परिसर उजळून निघालेले असताना परिसरातील विविध रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याचे चित्र बुधवारी रात्री आढळून आले. ऐन दिवाळीच्या सणालाही अंधाराचे साम्राज्य असल्याने या परिसरातील नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले असून, अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. दिवाळी सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे. मात्र देहूरोड ते निगडी दरम्यान महामार्गावरील अनेक पथदिवे रस्त्याच्या रुंदीकरण कामामुळे बंद आहेत.श्रीक्षेत्र देहूगाव येथे संत तुकाराममहाराजांच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांमुळे व तळवडे आयटी पार्कमुळे सर्वाधिक वर्दळ असलेल्या देहूरोड ते झेंडेमळा या रस्त्यावरील अनेक दिवे बंद आहेत. चिंचोली, अशोकनगर, शितळानगर, गांधीनगर, शिवाजीनगर आदी भागात विविध ठिकाणी पथदिवे बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली असून, कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे दिवे उपलब्ध नसल्याने दिवे लागत नसल्याची माहिती मिळाली आहे. लष्करी हद्दीतील अशोकनगर ते झेंडेमळा मुख्य रस्त्यावर लहान मोठे असंख्य खड्डे पडले असल्याने रात्री खड्डे चुकविताना दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड