शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

अभिजात संगीत जगण्याला देते बळ - राजेश ढाबरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 02:41 IST

संगीत माणसाला ताजेतवाने ठेवते. बालपणापासूनच संगीताची आवड असल्यामुळे तथागत बुद्धांच्या जीवनावरील गाण्यांची हिंदी भाषेत निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. पहिलाच अल्बम जनतेने डोक्यावर घेतल्याने नवनिर्मितीला बळ मिळाले. मोठमोठ्या गायकांनी गाणी गायली. आईच्या प्रेरणेमुळेच हे शक्य झाले.

संगीत माणसाला ताजेतवाने ठेवते. बालपणापासूनच संगीताची आवड असल्यामुळे तथागत बुद्धांच्या जीवनावरील गाण्यांचीहिंदी भाषेत निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. पहिलाच अल्बम जनतेने डोक्यावर घेतल्याने नवनिर्मितीला बळ मिळाले. मोठमोठ्या गायकांनी गाणी गायली. आईच्या प्रेरणेमुळेच हे शक्य झाले. संगीत जगण्याला बळ देते. एक तरी कला प्रत्येकाने जपली पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक राजेश ढाबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आई रेडिओ ऐकायची तेव्हा आईमुळे माझ्याही कानांवर संगीताचे सूर पडायचे; पण तेव्हा त्याचा अर्थबोध व्हायचा नाही. तरीही सूर निरागस असल्यामुळे ते अलगदपणे माझ्यावर परिणाम करून गेले. आईच्या प्रेरणेमुळेच मी गायक-संगीतकार झालो, असे सांगत प्रशासकीय अधिकारी राजेश ढाबरे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना आयुष्यातील जीवनगाणी कशा पाऊलवाटा बनल्या तो प्रवास उलगडला. बाल्यावस्थेत असतानाच चित्रपट पाहण्याची आवड जडली. वाटेल ते करून चित्रपट पाहायचो. केवळ चित्रपटातील गाणी दृश्य स्वरूपात बघावीत, म्हणून हा खटाटोप असायचा. आम्ही जिथे राहत होतो, तिथे कोष्टी समूह बांधवांचे भजनांचे कार्यक्रम ऐकायला जात होतो. तिथे कधी-कधी गाण्याची संधी मिळायची. भजन गायला लागलो. १९७५-७६चा काळ असेल, तेव्हा भजनांची गोडी लागली. सूर तिथेच गवसला. त्या वेळी जोडले गेलेले बंध आजही मैत्रीच्या स्वरूपात घट्ट आहेत.पं. बच्छराज व्यास विद्यालयात शिकत असताना माझी आवड ‘पॅशन’ बनू लागले. त्याचे कारण म्हणजे शाळेतील सर्व उपक्रमांमधील माझा पुढाकार आणि अभ्यासातील गतीमुळे शिक्षक माझ्यावर विशेष लक्ष द्यायचे. शाळेतच गायक-कलाकार अशी ओळख निर्माण झाली. विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस कधीच सोडले नाही. बक्षिसांतून प्रेरणा मिळत गेली. घरातील वातावरण शैक्षणिक, सांस्कृतिकही आहे. वर्गात पहिला असायचो. नागपूरला शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये अकरावीला असताना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अग्रस्थानी असायचो. ‘कोई नजराणा लेकर आया मै तेरा दिवाना...’ असे गीत तेव्हा सादर केले. कलेतून एक आत्मिक समाधान मिळते. माणूस फ्रेश राहतो. इंजिनिअरिंगला असताना रॅगिंग मोठ्या प्रमाणात चालायचे; पण आमचे सिनिअर गाणे म्हणायला सांगून मला सोडून द्यायचे. परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून इथेच ओळख मिळाली. सोलो प्रोग्राम सुरू केले होते. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यात यश मिळाल्यावर पहिली पोस्टिंग हैदराबादला होती. असिस्टंट कमिशनर म्हणून तिथे काम करीत असतानाही नाटक, पथनाट्य, संगीत यांत सहभाग असायचा. नाटकाला संगीत देणे, प्रत्यक्ष त्यात अभिनय करणे असे छोटे-मोठे प्रयोग सुरूच होते. आजही गाणे नेहमी माझ्यासोबत राहिले आहे. तथागत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान जगापर्यंत पोहोचावे, यासाठी त्यांचा विचार गाण्यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि पहिलाच अल्बम जगप्रसिद्ध झाला. लिरिक्स आणि म्युझिक दोन्ही एकाच वेळी करण्याचा एक यशस्वी प्रयोग मी केला. पत्नी भावना संगीत विशारद आहे. त्यामुळे माझा शास्त्रीयदृष्ट्या संगीताचा अभ्यास नसला, तरी ती ते सगळे जुळवून आणत होती. पहिल्या अल्बममध्ये ८ गीते, तर दुसºया अल्बममध्ये १० गीते आहेत. मेरिट आणि क्वॉलिटीबरोबरच बॉलिवूड टच असल्यानेच लता मंगेशकर यांनी ‘बुद्धं सरणं गच्छामि...’ हे गीत माझ्या अल्बममध्ये गायिले आहे. त्यांच्याबरोबरच सोनू निगम, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, श्रेया घोषाल, अनुज अलोरा, आशा भोसले यांनी मी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी गायली आहेत.

टॅग्स :Puneपुणे